
यंदा श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी शनिवार येत असल्याने शुक्रवारी (२५ जुलै) रात्रीच भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक पायी निघणार आहेत. हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पहाटे ४ वाजता अभिषेकाचा साक्षीदार होता येणार आहे. असे असतानाच
.
यासोबतच यंदा पहिल्यांदाच भाविकांना शनिवार ते सोमवार घृष्णेश्वराचाही अभिषेक करता येणार नाही. श्रावणातील सोमवारी भाविक दर्शनासाठी वेरूळला दाखळ होतात. यासाठी प्रशासनाने जास्तीच्या बस सोडल्या आहेत.
मंगळवारपासून भाविकांना करता येणार गाभाऱ्यात अभिषेक
घृष्णेश्वराला श्रावणातील पहिला अभिषेक रविवारी रात्री १२ वाजता होणार आहे. यानंतर नैमित्तिक पारंपरिक अभिषेक मंदिर विश्वस्त करतील. मात्र, सर्वांना दर्शन घडावे म्हणून शनिवार, रविवार आणि सोमवारी अभिषेक करता येणार नाही. याव्यतिरिक्त मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी भाविकांना गाभाऱ्यात अभिषेक करता येणार आहे. -योगेश टोपरे, अध्यक्ष, घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट.
जादा बस : शनिवारी, सोमवारी वेरूळ, खुलताबादकडे धावणार
छत्रपती संभाजीनगर | वेरूळ येथील बारापैकी एक श्री घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. त्यांची संख्या लक्षात घेऊन विभागीय नियंत्रकांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार व शनिवारी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत वेरूळसाठी १८ तर शनिवारी खुलताबादकरिता २२ जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बससेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश विभागीय नियंत्रकांनी जिल्ह्यातील आठही आगारप्रमुखांना दिले आहेत.
खुलताबादच्या वाहतूक मार्गात आजपासून बदल
कसाबखेड्याच्या जवळ शिवशंकराची ही विशाल मूर्ती शिवभक्तांचे लक्ष वेधते. जमिनीपासून ५३ फूट उंच असलेली ही मूर्ती ॲक्रिलिकमध्ये बनवण्यात आली आहे. खास इंदूरवरून ही मूर्ती बनवून आणली. १७ फुटांचा बेस यासाठी बनवण्यात आला आहे. डॉ. विक्रम ठाकूर यांनी वडील शिवभक्त नानुराम ठाकूर (६५) यांची इच्छा पूर्तीसाठी३ एकर शेतात ही मूर्ती स्थापित केली.
श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात दर्शनानिमित्त भाविकांची अलोट गर्दी होते. यामुळे वाहतूक कोंडी होते.
- हे मार्ग राहणार बंद : नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट (मध्यम व जड वाहनांसाठी) दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद घाट गेट मार्ग (सर्व प्रकारच्या वाहनांसाठी)
- पर्यायी मार्ग : संभाजीनगरकडून नाशिक-धुळे जाणारी मध्यम व जड वाहने भगवान महावीर चौक, नगर नाका, एएस क्लब, करोडीमार्गे नवीन धुळे-सोलापूर हायवेने जांभाळा, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे जातील.
- नाशिक-धुळ्याकडून शहरात येणारी मध्यम व जड वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, एएस क्लब मार्गाने जातील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.