digital products downloads

महिलेची तिडीक: ‘माझा वापर केला’ म्हणत आधी 5 दगडांनी ठेचले; थंड डोक्याने केले कोयत्याने 8 वार, नाशिकमधील घटना – Nashik News

महिलेची तिडीक:  ‘माझा वापर केला’ म्हणत आधी 5 दगडांनी ठेचले; थंड डोक्याने केले कोयत्याने 8 वार, नाशिकमधील घटना – Nashik News



विल्होळीत हायवेलगत एका महिलने साथीदाराच्या मदतीने जुन्या नाशिकमधील कुंभारवाड्यातील सुरज सोळंकी (37) यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्याला 5 दगडांनी ठेचले. संतापाची तिडीक डोक्यात असलेल्या या महिलेने बॅगेतून कोयता आणत त्याच्या डोक्यावर 8 वार केले. सोमवारी (दि. 13) दुपारी 4.30 वाजताचा हा थरार एक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद करत पोलिस पाटलांना कळविल्यानंतर घटना उघडकीस आली. गंभीर जखमी सुरजवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुरज हे वहिनी व पुतण्यासोबत कुंभारवाड्यात राहतात. दुपारी 3.30 वाजता फोन आल्यानंतर ‘तुला बघून घेतो’ असे बोलून तो घाईने दुचाकी एमएच 15 डी.जे. 9555 हून निघून गेला. 4.40 वाजता वहिनीने फोन केला. मात्र, फोन बंद आला. 6.30 वाजता आम्ही कुटुंबियांना माहिती दिल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. अनैतिक संबंधातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यांनी व्हिडिओ केल्यामुळे उघडकीस आला हल्ला मी कारमधून जात होतो. रस्त्यालगत ती महिला आणि एक पुरुष दुसऱ्या एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे पाहिले. मी कारमधूनच महिला कोयत्याने वार करतांनाचे शुटिंग मोबाईलमध्ये केले. ते पोलिस पाटील यांना कळवले. दुचाकीचा पाठलाग केला. मात्र, जैन मंदिरपासून ते मुंबईकडे दुचाकीने पळून जाण्यात यशस्वी झाले. – संजय मोहिते, प्रत्यक्षदर्शी चेहरा आणि नंबरप्लेट झाकली हल्ला करताना चेहरा आणि पलायन करताना गाडीची नंबर प्लेट दोन्ही स्कार्फने झाकले.
परिणामी, पोलिस उशीरापर्यंत आरोपी आणि तिच्या साथीदाराचा शोध घेवू शकले नाहीत. फोन करुन हायवेला बोलावले महिलेने सुरजला दुपारी 3:30 वाजता फोन करुन विल्होळीत हायवेवर बोलावून घेतले.
4:30 वाजता त्याच्या वहिनीने फोन केला असता त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. बॅगेतून कोयता, मिरचीपूड आणली हल्लेखोर महिलेने बॅगेतून मिरचीपुड आणि कोयता आणले होते.
सुरजला मारण्याचा नियोजनबद्ध कट करुन ती पूर्ण तयारीनिशी आली होती. सुरजच्या दुचाकीच्या मागे ‘औरत की इज्जत करो, औरत पर भरोसा मत करो’ असे लिहिले आहे. फोनवर बोलताना ‘जेनी’ नाव घेत ‘आज तुमची वाट लावतो, मी आलोच तुम्ही तिथेच थांबा’ असे संतापाने बोलत घरातून गेल्याचे त्याच्या वहिनीने सांगितले. सोळंकीची मुलगी व आई अहमदाबादला राहतात. तो मल्हारखाणीतून 4 दिवसांपूर्वीच वहिनीकडे रहायला आला होता. त्याला डायबिटीस असून, पायाचा पंजा काढायचा असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp