
- Marathi News
- National
- Where Is Career In The Age Of AI?, Bhaskar Series: Part 1 40% Of Companies Give Preference To Those With A Degree+AI In Jobs
नवी दिल्ली18 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
देशात आयटी, कायदा, वाणिज्य, भाषांतर, डिझाइन आणि ग्रंथालय विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. एआय टूल्सने ती कामे एकतर संपवली आहेत किंवा खूप कमी केली आहेत, ज्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी पदव्या घेतात. टीमलीजसारख्या मोठ्या एचआर कंपनीचे म्हणणे आहे की ४०% कंपन्या ‘हायब्रीड स्किल’ म्हणजेच पदवीसोबत एआय टूल्सची माहिती असणे अनिवार्य मानतात. नॅसकॉमच्या २०२४ च्या अहवालानुसार देशातील ८२% बीसीए व एमसीए पदवीधरांना एआय टूल्सचे औपचारिक प्रशिक्षण नाही.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, ‘नोकऱ्या अशा लोकांकडे राहतील, जे एआय टूलचा वापर करून उत्पादकता ४०% पर्यंत वाढवू शकतात.’ आयबीएम इन्स्टिट्यूट फॉर बिझनेस व्हॅल्यूचा अहवाल सांगतो- एआय लोकांची जागा घेणार नाही, पण जे एआय वापरतात ते त्यांची जागा घेतील, जे एआय वापरत नाहीत. ‘फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५’ नुसार, २०३० पर्यंत २२% नोकऱ्या प्रभावित होऊ शकतात.
चीनने १२ हजार पदव्या रद्द केल्या, AI कोर्स सुरू
बीजिंग | चीनने २०२१ ते २०२५ दरम्यान आपल्या विद्यापीठांमधील १२,२०० हून अधिक पदवी कार्यक्रम रद्द किंवा निलंबित केले, तर सुमारे १०,२०० नवीन कार्यक्रम सुरू केले. यातील बहुतांश कपात कला, मानविकी, विदेशी भाषा आणि व्यवस्थापन क्षेत्रात केंद्रित होती. कारण चीन सरकार विद्यापीठांवर एआय, सेमीकंडक्टर्स, रोबोटिक्स आणि इतर धोरणात्मक उद्योगांसाठी टॅलेंट तयार करण्याचा दबाव आणत आहे.
येथे कर्नाटकाने केली सुरुवात…
राज्य सरकारने कमी प्रवेश आणि इतर कारणांचा हवाला देत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सरकारी महाविद्यालयांमधील ४५८ बीए, बीएससी, बीकॉम कार्यक्रम संयोजने (कॉम्बिनेशन्स) बंद केली आहेत. १,३००+ कोर्सेसमधील जागा कमी केल्या.
एक्स्पर्ट व्ह्यू पंकज बन्सल, सहसंस्थापक, एचआर-टेक कंपनी ‘पिपुलस्ट्राँग’ आणि ‘टॅग्ड’
प्रश्न- ज्यांनी या पदव्या घेतल्या, घेताहेत त्यांनी काय करावे?
1. पारंपरिक पदवी असणाऱ्यांचे काय? पारंपरिक पदव्या पूर्णपणे निरुपयोगी होणार नाहीत, परंतु त्यांचे स्वरूप अप्रासंगिक होत आहे. अभ्यासाची पद्धत आणि आशय बदलला नाही तर त्या पदव्यांना किंमत उरणार नाही. बाजारात केवळ थेअरी किंवा रट्टा मारणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांची गरज संपत आहे.
2. पदवी घेत आहेत, ते काय करू शकतात? जे विद्यार्थी सध्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात आहेत त्यांनी लाइव्ह प्रोजेक्ट्सवर काम सुरू करावे. एआय टूल्सचा प्रोफेशनल परवाना घ्यावा, त्यावर ६ महिने रात्रंदिवस काम करावे आणि सॉफ्टवेअर किंवा वेबसाइट्स बनवाव्यात.
3. ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे त्यांनी काय करावे? सर्वात उत्तम मार्ग आहे- इंटर्नशिप आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्ट. जर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीत संधी मिळत नसेल तर लहान स्टार्टअप, एनजीओ किंवा तुमच्या स्थानिक क्षेत्रातील एखाद्या कारखान्यात किंवा दुकानात जा. त्यांच्या समस्या समजून घ्या आणि एआयच्या मदतीने त्या सोडवा.
4. ‘ग्रॅज्युएशन’ची व्हॅल्यू किती उरेल?
भारतात सध्या नोकरीचे अर्ज शॉर्टलिस्ट करण्यासाठी ग्रॅज्युएशनचे ‘स्टॅम्पिंग’ आवश्यक आहे आणि ही स्थिती पुढील ३ ते ५ वर्षे राहील. पण यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसीचा (NEP) ‘५.५ क्रेडिट स्कोअर’ याची जागा घेईल, जिथे प्रॅक्टिकल काम आणि प्रोफेशनल कोर्सेसच्या माध्यमातून गुण मिळतील. येणाऱ्या काळात लोक विचारतील की तुम्ही ‘५.५ स्केलर’ आहात की नाही. टेक विश्वात पहिल्या नोकरीनंतर कोणीही तुमची पदवी विचारणार नाही.
5. अशा वेळी नोकरी मिळवण्याचा उत्तम मार्ग कोणता?
सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही ‘10x इंजिनिअर’ किंवा ‘10x प्रोफेशनल’ बना, म्हणजेच जो एकटा १० सामान्य लोकांचे काम सांभाळू शकेल. तुम्ही एआयच्या मदतीने एखाद्या कंपनीचा वेळ आणि खर्च वाचवू शकत असाल तर जिथे पूर्वी ५ लाख रुपयांचे सुरुवातीचे पॅकेज मिळत होते तिथे आज कंपन्या २५ लाख रुपयांचा सुरुवातीचा पगार द्यायला तयार आहेत. कंपन्यांना ‘सामान्य’ लोक नकोत, तर कामाची माणसे हवी आहेत.
6. एआय कोर्सेसमुळे नोकरी मिळण्याचे दावे खरे आहेत का? अजिबात नाही. गल्लीबोळातील कोणत्याही संस्थेतून एआयचे प्रमाणपत्र घेतल्याने नोकरीची कोणतीही हमी मिळत नाही. एआय प्रमाणपत्र सीव्ही शॉर्टलिस्ट होण्यास मदत करू शकते, पण नोकरी तेव्हाच मिळेल जेव्हा मूलभूत पात्रता असेल, एआयचे व्यावहारिक ज्ञान असेल आणि असेसमेंट टेस्ट क्लिअर कराल.
7. एंट्री लेव्हल म्हणजेच फ्रेशर्सच्या नोकऱ्यांवर याचा काय आणि किती परिणाम होत आहे? सुरुवातीच्या काळात नक्कीच दबाव आहे कारण जे मूलभूत काम पूर्वी १० लोक मिळून करत होते, ते आता दोन लोक एआयच्या मदतीने पूर्ण करत आहेत. इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस सारख्या पारंपारिक कंपन्यांनी सुरुवातीला फ्रेशर्सची भरती थांबवली किंवा पुढे ढकलली आहे. परंतु हा केवळ अल्पकालीन ट्रेंड आहे, दीर्घकाळात जॉब मार्केटमध्ये नेट ॲडिशनच (नोकऱ्यांमध्ये वाढ) होणार आहे.
8. जेव्हा आयटी कंपन्या भरती थांबवत आहेत, तेव्हा नवीन तरुणांना नोकरी कुठे मिळेल? भारतात सध्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स म्हणजेच जीसीसीची (GCCs) लाट आली आहे. देशात ४००० हून अधिक जीसीसी आहेत आणि दर आठवड्याला दोन नवीन सेंटर्स उघडत आहेत. हे सेंटर्स एआय स्किल्स असलेल्या तरुणांना खूप मोठे पॅकेज आणि उच्च पगारावर नियुक्त करत आहेत. याशिवाय हळूहळू पारंपारिक कंपन्यांमध्येही पुन्हा नियुक्त्या सुरू होऊ लागल्या आहेत.
9. एआय माणसांची पूर्णपणे जागा घेईल का, याचा खर्च माणसांपेक्षा कमी आहे का? जागतिक संस्थांना समजू लागले आहे की एआयचा खर्च (टोकन आणि जीपीयू प्रोसेसिंग खर्च) मानवी खर्चापेक्षा कमी नाही. अनेक स्टार्टअप्सचे एआयचे बिल इतके जास्त येत आहे की ते एआय टूल्सऐवजी दोन माणसांना कामावर ठेवणे अधिक चांगले मानत आहेत. याशिवाय, ज्या कामांमध्ये मानवी निर्णय आणि लोकांशी जोडले जाण्याची गरज असते, तिथे एआय कधीही माणसाची जागा घेऊ शकत नाही.
10. अशी कोणती मानवी वैशिष्ट्ये आणि क्षेत्रे आहेत, जिथे माणूसच सर्वात पुढे राहील? एआयच्या काळात चार मानवी वैशिष्ट्ये सर्वात मौल्यवान बनली आहेत- ॲग्रिगेशन ॲबिलिटी (गोष्टी एकमेकांशी जोडण्याची समज), डिसिजन मेकिंग (निर्णयक्षमता), हाय ईक्यू (इमोशनल कोशंट) आणि आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य. जर क्षेत्रांबद्दल बोलायचे झाल्यास, हॉस्पिटॅलिटी, डेटा सायन्सेस, सेल्स आणि एआय-असिस्टेड स्पेशालिस्ट्स (जसे डॉक्टर किंवा पत्रकार ज्यांना एआय माहीत आहे) यांच्या भूमिका नेहमी सुरक्षित आणि मजबूत राहतील.
यांची व्हॅल्यू कमी… जाणून घ्या का?
कोर्स / डिग्री एकूण नामांकन दरवर्षी पास आऊट जोखीम BA/MA अनुवाद 8.5-10 लाख 2.5-3 लाख 88% BCA/MCA 9.5-11 लाख 3-3.5 लाख 82% डिप्लोमा ग्राफिक्स 3.5-4 लाख 1.2-1.5 लाख 79% LLB/BA-LLB 5.0-5.5 लाख 1.3-1.5 लाख 70% B.Com/M.Com 45-48 लाख 14-15 लाख 61% B.Lib/M.Lib 45,000-50,000 18,000-20,000 55%
1. BA/MAभाषांतर : डीपएल एका पानाचे भाषांतर फक्त २ सेकंदांत करते, हेच काम एक अनुभवी अनुवादक ४५ मिनिटांत करत असे. २०१९ ते २०२४ दरम्यान अनुवादकांच्या नोकऱ्यांमध्ये ६०% पर्यंत घट झाली आहे.
2. BCA/MCA : गिटहब कोपायलट ४० सेकंदांत कोड लिहितो. हेच काम एक बीसीए पदवीधर ३ तासांत करत असे. २०२३ मध्ये ज्या कामासाठी १२ ज्युनियर कोडर लागत ती संख्या २०२५ मध्ये फक्त ३ वर आली आहे.
3. डिप्लोमा ग्राफिक्स : कॅनव्हा एआय सोशल मीडिया बॅनर १२ सेकंदांत बनवते, जे आधी ४५ मिनिटांचे काम होते. बेसिक लोगो व बॅनरचे दर २०२१ ते २०२४ दरम्यान ७०% ने घसरले. ६ ऐवजी २ ज्युनियर डिझायनर्सच पुरेसे आहेत.
4. B.Lib/M.Lib : आयआयटी दिल्लीच्या सेंट्रल लायब्ररीने KOHA चे एआय मॉड्यूल लागू केले. पूर्वी जिथे ४ लोक कॅटलॉग अपडेट करायचे, आता एकच व्यक्ती एआयच्या आउटपुटची पडताळणी करण्याचे काम करते.
एआयच्या काळात कुठे आहे करिअर?
एआयच्या काळात कोणाची नोकरी वाचेल, कोणाची जाईल? कोणाचा पगार वाढेल, कोणाचा कमी होईल? कोणती पदवी ‘कामी’ येईल आणि कोणाचे ‘काम तमाम’ होईल? बीसीए, बीकॉम, बीए (भाषांतर) किंवा इतर कोणतीही पदवी घेणारे ‘बेकार’ होतील का? केवळ एआय कोर्सचे प्रमाणपत्र दिल्याने नोकरी सहज मिळेल का? पदवीचे काही औचित्य उरेल का? १० वी-१२ वीत शिकणाऱ्या मुलांचे भविष्य काय असेल? त्यांच्यासाठी नेमके कोणत्या क्षेत्रात करिअर करणे सुरक्षित राहील? अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे देईल भास्करची ही विशेष मालिका. ‘एआयच्या काळात कुठे आहे करिअर?’. पहिल्या भागात वाचा, कोणत्या पदव्यांवर सर्वाधिक परिणाम होईल…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
