
- Marathi News
- National
- Kailash Yatra Begins; 28 Thousand Will Be Spent In Tibet!, 44 Devotees Leave From Nathula
मनमीत | डेहराडून4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कैलास मानसरोवर यात्रा २०२६ शनिवारपासून सुरू झाली आहे. ४४ भाविकांचा (३२ पुरुष, १२ महिला) पहिला जथ्था सिक्कीमच्या नथुला खिंडीतून चीनमध्ये दाखल झाला. सर्वांचे सरासरी वय ३० ते ७० दरम्यान आहे. कैलास मानसरोवर यात्रा दोन मार्गांनी होते. पहिला- नथुला व दुसरा- उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड. लिपुलेख मार्गाने जाणाऱ्या भाविकांकडून चीन ३०० डॉलर (सुमारे २८,००० रुपये) जास्त घेणार आहे.
तिबेट स्वायत्त क्षेत्रात १२ दिवस राहण्याचा खर्च गेल्या वर्षापर्यंत ११०० डॉलर (१.०४ लाख रुपये) होता. यंदा तो वाढवून १४०० डॉलर (१.३२ लाख रुपये) केला. नथुला मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनाही या वेळी २७०० डॉलर (२.५४ लाख रुपयांपर्यंत) खर्च करावे लागतील. कुमाऊँ मंडल विकास निगमचे कैलास मानसरोवर यात्रा प्रभारी राजेश कुमार यांनी सांगितले की, चीनकडून या वेळी फी वाढवली आहे. या मार्गावरून परतणाऱ्या भाविकांना कुमाऊँच्या जागेश्वर मंदिर व कैची धाम येथेही दर्शन घडवले जाईल. चीनच्या अधिपत्याखालील तिबेटमध्ये राहणे, खाणे, वाहतूक, तिकीट इत्यादींवर पैसे खर्च होतात.

लिपुलेख मार्गावर खर्च
यात्रेचा काळ : २२ दिवस भारतात यात्रा खर्च: ६० हजार रु. पुष्टीकरण रक्कम : ५ हजार रुपये वैद्यकीय तपासणी: ५५०० रुपये चिनी व्हिसा शुल्क : २४०० रुपये
समूह खर्च: ४ हजार रुपये तिबेटमधील फी : १.३२ लाख रुपये
तिबेटमध्ये ३ किमी पायी चालणार
या वेळी १६ हजार फूट उंचीवर: लिपुलेख खिंडीतून तिबेटी बेस पॉइंटपर्यंतचे ३ किमी अंतर पायीच पार करावे लागेल. कोणताही घोडा, खेचर, पोर्टर मिळणार नाही. प्रवाशांना कमी, हलके सामान घेण्याचा सल्ला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
