26/11 च्या न्यायालयीन लढ्याची झलक: ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

26/11 च्या न्यायालयीन लढ्याची झलक:  ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’चा टीझर प्रदर्शित


अभिनेता राजकुमार रावच्या बहुप्रतीक्षित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे. टीझरमधील त्याचा लूक, देहबोली आणि संवाद पाहून प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. २६/११ च्या लढ्याची कथा चित्रपटाच्या टीझरमध्ये 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतरच्या न्यायालयीन लढ्याची झलक दाखवण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी अजमल कसाबविरोधात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडत त्याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या ऐतिहासिक खटल्यासह त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांवर चित्रपट आधारित असल्याचे दिसून येते. टीझरमध्ये कोर्टरूममधील काही प्रभावी दृश्ये दाखवण्यात आली असून, राजकुमार रावने उज्ज्वल निकम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून भूमिका साकारल्याचे स्पष्ट जाणवते. जरी टीझरमध्ये कथानकाबाबत फारशी माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी पार्श्वसंगीत, संवाद आणि दृश्यरचना प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी ठरली आहे. निकम यांची ऐतिहासिक कारकीर्द उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक मानले जातात. त्यांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण तसेच कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण यांसारख्या अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. कायदेविषयक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कायदेविषयक कारकिर्दीची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. आता त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची कथा ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन VIDEO ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp