पाटण्यात काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये धुमश्चक्री: अनेक नेत्यांची डोकी फुटली; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसचे कार्यकर्ते आधीपासूनच लाठ्या घेऊन तयार होते

पाटण्यात काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये धुमश्चक्री:  अनेक नेत्यांची डोकी फुटली; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसचे कार्यकर्ते आधीपासूनच लाठ्या घेऊन तयार होते



पाटण्यात बुधवारी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. भाजप नेते काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी लाठ्या चालल्या, दगडफेक झाली. पोलीस यावेळी शांतपणे उभे असलेले दिसले. भाजप नेत्यांचा आरोप आहे की, काँग्रेस नेते आधीच दगड आणि लाठ्या घेऊन मारामारीसाठी तयार बसले होते. दोन्ही पक्षांमधील मारामारीदरम्यान सुरुवातीला पोलीस शांतपणे उभे असलेले दिसले. त्यानंतर प्रकरण वाढल्यावर पोलिसांनी कारवाई केली. भाजपचे म्हणणे आहे की, राहुल गांधींनी दुर्भावनापूर्ण हेतूने पंतप्रधान निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करून गोंधळ घातला. काँग्रेसकडून देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपने म्हटले आहे की, गंभीर धोक्यात टाकण्याची काँग्रेसची प्रवृत्ती राहिली आहे. काँग्रेस राजकीय विरोधकांच्या घराबाहेर निदर्शने करण्यासारख्या निंदनीय परंपरेला प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, पाटणा महानगर जिल्हाध्यक्ष रूप नारायण मेहता यांनी पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात काँग्रेस प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार यांच्यासह डझनभर नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस कार्यालयाच्या बाहेरून आलेली काही छायाचित्रे बघा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »