digital products downloads

संभाजीनगरात ‘गेल’ कंपनीचा 100 मेगावॅटचा साैर प्रकल्प: यूपीसह 3800 कोटींची गुंतवणूक

संभाजीनगरात ‘गेल’ कंपनीचा 100 मेगावॅटचा साैर प्रकल्प:  यूपीसह 3800 कोटींची गुंतवणूक

  • Marathi News
  • National
  • GAIL’s 100 MW Solar Project In Sambhajinagar; Investment Of Rs 3800 Crore Including UP

नवी दिल्ली20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘गेल’ (इंडिया) लिमिटेडकडून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात तब्बल ३,८०० कोटी रुपयांचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०० मेगावॅट क्षमतेचा मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. कंपनीच्या अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ‘गेल’ने ही मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे.

छत्रपती संभाजीनगरात उभारल्या जाणाऱ्या १०० मेगावॅटच्या या सौर प्रकल्पात प्रति तास २२ मेगावॅट क्षमतेची ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम’ (बीईएसएस) बसवली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील उसर येथील पीडीएच-पीपी प्लँटची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होईल. विशेष म्हणजे, या अत्याधुनिक स्टोरेज सिस्टिममुळे सौर ऊर्जेतील खंडिततेच्या समस्या दूर होऊन, चोवीस तास विश्वासार्ह वीज उपलब्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील प्रकल्पाव्यतिरिक्त, ‘गेल’कडून उत्तर प्रदेशातील झाशी येथील सोलर पार्कमध्ये ६०० मेगावॅटचा भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी ५५० मॅगावॅट क्षमतेची बॅटरी सिस्टिम असेल.

अक्षय ऊर्जा क्षमता १००० मेगावॅटच्या पार- दीपक गुप्ता

हे नवे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ‘गेल’ची स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता सध्याच्या १४७ मेगावॅटवरून थेट १,००० मेगावॅटच्या पुढे जाईल. भविष्यातील ऊर्जा सुरक्षेसोबतच पर्यावरणाप्रती असलेली आमची बांधिलकी यातून स्पष्ट होते,असे या प्रकल्पांविषयी माहिती देताना ‘गेल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp