digital products downloads

इराणच्या धमकीनंतर आता ‘ट्रम्प ब्रिगेड’ला हवी शांतता: ऑफर घेऊन पाकचे लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये

इराणच्या धमकीनंतर आता ‘ट्रम्प ब्रिगेड’ला हवी शांतता:  ऑफर घेऊन पाकचे लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये

  • Marathi News
  • International
  • After Iran’s Threat, ‘Trump Brigade’ Now Wants Peace, Pakistan Army Chief Munir In Tehran With Offer

वॉशिंग्टन/तेहरान51 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

होर्मुझमधील अमेरिकन नाकाबंदीवर इराणने कडक इशारा दिला आहे. इराणी कमांड खातम-अल-अंबियाचे कमांडर अली अब्दुलाई यांनी इशारा दिला आहे की, अमेरिकेने होर्मुझची नाकाबंदी लवकर संपवली नाही तर परिसरातील इतर सागरी मार्गांना- पर्शियन आखात, तांबडा समुद्र व ओमान समुद्राला लक्ष्य केले जाईल. यामुळे घाबरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दूतांनी इराणला शांततेसाठी राजी करण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत.

पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर ट्रम्प यांची ऑफर घेऊन बुधवारी रात्री तेहरानला पोहोचले. त्यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांच्याशी चर्चा केली. तर पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ सौदी अरेबियाला पोहोचले.

ट्रम्प चीनला दाखवू पाहताहेत अमेरिकी ताकद

  • ट्रम्प इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. ते म्हणताहेत, हे युद्ध जवळपास संपले आहे. पण आता ट्रम्प युद्धविरामाच्या नावाखाली चीनला अमेरिकी ताकद दाखवण्याची संधी सोडत नाहीत. होर्मुझ खुला करण्याची घोषणा करून ट्रम्प म्हणाले, यामुळे चीनही खूश होईल. मात्र, होर्मुझ सामुद्रधुनीतून तर चीनची जहाजे सहज पार होत होती.
  • पुढच्या महिन्यात चीन दौऱ्यावर जाणारे ट्रम्प म्हणाले, होर्मुझ खुला केल्यावर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग त्यांचे प्रेमाने मिठी मारून स्वागत करतील. ट्रम्प असे सांगून जिनपिंग यांना दाखवून देऊ इच्छितात की चीनचा आर्थिक विकास होऊनही अमेरिका अजूनही जगात नंबर वन आहे.
  • ट्रम्प म्हणाले, आता चीनने इराणला शस्त्रे देण्यास नकार दिला आहे. वास्तविक चीनने या युद्धात इराणला शस्त्रांसोबतच सॅटेलाईट डेटाही दिला होता. यामुळे इराण आखाती देशांवर अचूक हल्ले करू शकला. आता ट्रम्प असे विधान करून चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत.

२१ हजार मे.टन एलपीजी घेऊन भारतीय टँकर कांडला पोर्टवर

नवी दिल्ली | पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय जहाज ‘जग विक्रम’ २०,४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन गुजरातच्या कांडला पोर्टवर पोहोचले. या जहाजाने ११ एप्रिल रोजी होर्मुझ पार केले होते. अमेरिका-इराण तणावामुळे होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवरील धोका वाढला आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या १४ भारतीय टँकर आणि जहाजे अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध वाहिन्या आणि संबंधित देशांशी चर्चा सुरू आहे. केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाच्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून २३०० भारतीय खलाशी होर्मुझमधून सुरक्षित भारतात परतले आहेत.

जहाजांवरील हल्ले अस्वीहार्य : जयशंकर…

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, होर्मुझमध्ये जहाजांवरील हल्ले अस्वीहार्य आहेत. एजेक प्लसच्या बैठकीत त्यांनी जहाजांची सुरक्षित विनाअडथळा वाहतूक व वाहतुकीचे स्वातंत्र्य या तत्त्वांवर भर दिला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp