digital products downloads

‘हे धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित कट’: नाशिक TCS प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत मोठा आरोप

‘हे धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित कट’:  नाशिक TCS प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत मोठा आरोप

नवी दिल्ली5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

“नाशिक TCS मधले हे केवळ धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित डाव आहे,” असा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशाची सद्सद्वविवेकबुद्धी हादरल्याचा उल्लेखही या याचिकेत करण्यात आलाय. नाशिक TCS प्रकरणाने देशभर हलकल्लोळ माजवला आहे. हे सक्तीचे किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर ही केवळ धार्मिक बाब नसून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असे सांगणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

धर्मांतराशी संबंधित एक स्वयं-प्रेरित (suo motu) प्रकरण यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता नाशिक टीसीएस प्रकरणासंदर्भात त्याच प्रकरणात एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणाऱ्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, नाशिकमधील संघटित धर्मांतराचे हे प्रकरण संपूर्ण राष्ट्राच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का देणारे आहे.

याचिकेत नेमके काय?

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अनेक महत्त्वपूर्ण दावे आणि मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, सक्तीचे किंवा फसवणुकीचे धर्मांतर देशासाठी एक गंभीर धोका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा हे एका मोठ्या, संघटित आणि जबरदस्तीच्या मोहिमेचा भाग म्हणून घडते, तेव्हा त्याला “दहशतवादी कृत्य” मानले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे, असे म्हटले आहे की सक्तीचे किंवा फसवणुकीचे धर्मांतर ही एक वेगळी धार्मिक घटना नसून एक “सुनियोजित कट” आहे.

परकीय शक्तींकडून निधी

याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की या कटासाठी अनेकदा परकीय शक्तींकडून निधी पुरवला जातो. याचा उद्देश देशातील धार्मिक लोकसंख्येचे संतुलन बदलून भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणे हा आहे. या याचिकेत असेही म्हटले आहे की, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी, हे स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकतेच्या अटींच्या अधीन आहे. याचा अर्थ असा की, या स्वातंत्र्याच्या नावाखाली सक्तीने किंवा फसवणुकीने धर्मांतर केले जाऊ शकत नाही.

न्यायालयाकडे दोन मागण्या

याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडे दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी अशी आहे की, केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना फसवणूक किंवा बळजबरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात यावेत. दुसरी मागणी अशी आहे की, केंद्र आणि राज्य सरकारांना धर्मांतराच्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश देण्यात यावेत. आता यावर न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

आंतरराष्ट्रीय संबंधाची शक्यता

नाशिक TCS BPO कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराप्रकरणी पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या 7 अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. 26 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान 9 महिलांनी एफआयआर (FIR) दाखल केलेत. प्रकरणाती मुख्य संशयित निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून तिचा शोध अद्याप लागलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी निदा खानची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तिच्या अटकेनंतर या रॅकेटमागील खरे सूत्रधार आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय संबंध उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांनी तिचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याचाही संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसाठी हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संशयिताची पत्नी समोर

या प्रकरणातला संशयित आरोपी शाहरुखची पत्नी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तिने सर्व आरोप फेटाळले. धर्मांतरासारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. सोबतच शाहरुख सहकाऱ्यांशी फक्त थट्टा-मस्करी करायचा. त्याला केलेली अटक, पुरावे या साऱ्यांवरच तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. “जर कोणासोबत इतके काही घडत होते, तर त्यांनी आधी तक्रार का केली नाही? कंपनीत मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांना का सांगितले नाही?” थेट इतके मोठे आरोप करणे आणि ते मीडियात अशा प्रकारे प्रसिद्ध करणे योग्य नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे कुटुंब तपासात पूर्ण सहकार्य करत असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे तिने शेवटी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील पीडितेचे तीन एफआयआर दिव्य मराठी डिजिटलच्या हाती लागलेत. ते पुढीलप्रमाणे…

पहिल्या पीडितेचा FIR…

पीडित महिलेने 2 एप्रिल रोजी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जून 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत ती TCS कार्यालयात असोसिएट होती. पती कामाच्या निमित्ताने पुण्यात राहतात. FIR मध्ये तिने सांगितले की, ‘24 जून 2025 रोजी मला 3 महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले. रजा मेमनचा माझ्या प्रशिक्षणाशी काहीही संबंध नसतानाही, तो माझ्या जवळ येऊन माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारत असे. तो म्हणायचा की पतीसोबत का राहत नाहीस, हनिमूनला कुठे गेली होतीस. तिथे काय केलेस, कसे केलेस. रजा मेमनसोबत शाहरुख कुरैशीदेखील होता.‘

महिलेने सांगितले, ‘सीनियर तौसीफ अत्तारनेही चुकीचे वर्तन केले. तोही टीममध्ये नव्हता, तरीही जवळ येऊन खाण्याबद्दल विचारायचा. अश्लील पद्धतीने विचारायचा, ‘संत्री आणली आहेस का? लहान वाली आणली आहेस की मोठीवाली?’ तो चेहरा जवळ आणायचा आणि स्पर्श करायचा. जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा म्हणाला, ‘तुला पुढे जायचे नाही का?’ पीडितेनुसार, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, आसिफ अन्सारी, तौसीफ अत्तार आणि शफी शेख यांनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. हिंदू देवी-देवतांना अपशब्द वापरले, ज्यामुळे तिच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. तिने एचआर सेलमध्ये तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. तेव्हा तिने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली.

दुसऱ्या पीडितेचा FIR…

मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंत तिचे ऑफिसमध्ये लैंगिक शोषण झाले. महिला कंपनीत क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या तक्रारी ऐकत असे. तिने सांगितले, ‘तौसीफ अत्तार स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ दाखवत असे आणि हिंदू धर्माला कमी लेखत असे. तो म्हणायचा की खरा देव तोच आहे, जो अदृश्य आहे. हिंदू धर्मात देव दिसतात, म्हणून ते खोटे आहेत.‘ ‘डिसेंबर 2025 ची गोष्ट आहे. मी दुपारच्या जेवणानंतर ताक पीत होते, तेव्हा तौसीफ आला आणि विचारले- ‘काय पीत आहेस?’ मी म्हणाले- ‘ताक पीत आहे.’ त्याने विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाला- माझ्याकडेही ताक आहे, प्यायला आवडेल का? असे म्हणत त्याने खासगी भागाकडे इशारा केला.’

तिसऱ्या पीडितेचा FIR…

तिसऱ्या FIR मध्ये पीडितेने सांगितले, ‘मी डिसेंबर 2024 मध्ये ऑफिसमध्ये होते. तेव्हा शफी शेख कामाच्या बहाण्याने जवळ येऊन बसला आणि जाणूनबुजून माझ्या पायाला आपला पाय घासण्याचा प्रयत्न केला. मग माझे कीपॅड वापरण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी खुर्ची दूर केली, तेव्हा तो हसत निघून गेला.’‘फेब्रुवारी 2026 मध्ये तौसीफने माझ्या धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्याने म्हटले की कृष्णाने 16 हजार महिलांशी लग्न केले, यावरून कृष्ण कसे होते हे कळते. भगवान शंकरांना हे माहीत नव्हते का की गणेश पार्वतीचे पुत्र आहेत? जर माहीत नव्हते तर देवी पार्वतीला पुत्र कसा झाला? त्यांनी गणेशाचे शीर का कापले?’

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp