‘काॅकरोच’नी दाखवली शक्ती: विरोधकांच्या अभावामुळे निर्माण राजकीय पोकळी भरून काढतेय काॅकरोच आंदोलन

‘काॅकरोच’नी दाखवली शक्ती:  विरोधकांच्या अभावामुळे निर्माण राजकीय पोकळी भरून काढतेय काॅकरोच आंदोलन

  • Marathi News
  • National
  • ‘Cockroach’ Has Shown Its Power, The Cockroach Movement Is Filling The Political Vacuum Created Due To The Lack Of Opposition.

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

ऑनलाइन उपहास म्हणून सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी पहिल्यांदाच स्क्रीनमधून बाहेर पडून रस्त्यावर ‘शक्ती’ दाखवली. संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थकांनी दिल्लीत जंतर-मंतरवर ५ तास निदर्शने केली. आंदोलकांनी नीट, सीबीएसई, सीयूईटी आणि एसएससीसारख्या परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधील अनियमिततेवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संध्याकाळी ५ पर्यंतचा अल्टिमेटम देताना दिपके म्हणाले की, मागणी मान्य न झाल्यास पुढच्या शनिवारी पुन्हा जंतर-मंतरवर पोहोचू.

उशिरा संध्याकाळी सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास म्हणाले की, ७ दिवसांत प्रधान हटले नाहीत तर आंदोलन देशभरात पसरवू. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हेदेखील निदर्शनांत सहभागी झाले होते. सरन्यायाधीश (सीजेआय) सूर्यकांत यांच्या टिप्पणीच्या निषेधार्थ दिपके यांनी १६ मे रोजी अमेरिकेत सीजेपीची सुरुवात केली होती. २१ दिवसांनंतर शनिवारी सकाळी ते दिल्लीत पोहोचले. ते म्हणाले- प्रधान यांच्यावर कारवाई करण्याऐवजी हे लोक आमचे अकाउंट हॅक करण्यात व पोस्ट हटवण्यात लागले आहेत. तुम्ही पोस्ट हटवू शकता, पण आम्हाला मिटवू शकत नाही. दिल्लीत लँडिंग करताना वाटत होते की मी माझ्या स्वातंत्र्याचे शेवटचे क्षण जगत आहे. तुरुंगाच्या भीतीने अनेक लोक विकले गेले. पण, देशातील तरुण आणि विद्यार्थी विकले गेले नाहीत. दुपारनंतर दिपके यांची प्रकृती खालावल्याने ३:३० वाजता निदर्शने संपली.

थेट इशारा : सरकार सोशल मीडिया पोस्ट हटवू शकते… आम्हाला नाही

मी अमेरिकेला जाताना माझी आई तेवढी रडली नव्हती, जेवढी परत येताना रडली. तिला माझ्या अटकेची भीती होती. राजकारणावर बोलणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या आई-वडिलांची हीच भीती आहे. शेवटी कुठपर्यंत भीतीत जगणार? त्यांना सांगा, आम्ही घाबरलेलो नाही.’ – अभिजित दिपके

ही सरकारविरोधातील असहमतीच्या सर्वात मोठ्या ऑनलाइन अभिव्यक्तींपैकी एक. भारतात १५-२९ वयोगटातील ४० कोटी तरुणांना पुरेशा नोकऱ्या निर्माण करणे आव्हानात्मक.

सीजेपी परीक्षेतील अनियमितता, बेरोजगारी व मर्यादित संधींमुळे तरुणांचा आवाज आहे. सोशल मीडियाची लोकप्रियता जमिनीवर समर्थनात बदलण्याचा हा प्रयत्न आहे.

सल्ला : सनस्क्रीन लावा, तिरंगाही आणा

कॉक्रोच जनता पार्टीने निदर्शनापूर्वी समर्थकांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. सहभागींना उन्हापासून बचावासाठी सनस्क्रीन लावून येण्यास सांगितले होते. पाण्याची बाटली, टोपी किंवा छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला दिला होता. तसेच तिरंगा आणि पुस्तक आणण्यास सांगण्यात आले होते. संघटनेने आंदोलकांना शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि अहिंसक राहण्याचा, पोलिसांशी संघर्ष टाळण्याचा तसेच कोणत्याही चिथावणीला बळी न पडण्याचा सल्लाही दिला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp