
- Marathi News
- National
- QR Code Box With ‘Ram Rajya Kosh’ Written On It Seized From An Accused, SIT Gets 15 Days For Investigation
अयोध्या/लखनौ7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या चौकशीत नवे खुलासे झाले आहेत. पोलिसांनी आरोपी अविनाश शुक्ल याच्या ठिकाणाहून ‘रामराज्य कोष’ लिहिलेली एक पेटी जप्त केली आहे, ज्यावर पेटीएमचा क्यूआर कोड लावलेला होता. ही पेटी त्या योग केंद्रातून मिळाली आहे, जिथे अविनाश गेल्या १० वर्षांपासून राहत होता. याचा काय वापर केला गेला, हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. यादरम्यान, यूपी सरकारने प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचा कार्यकाळ १५ जुलैपर्यंत वाढवला आहे, जेणेकरून सर्व बाजूंची सखोल चौकशी करता येईल.
आतापर्यंत अटक केलेल्या ८ आरोपींकडून ₹८० लाख रोख, ११२१ अमेरिकन डॉलर, ११ ग्रॅम सोने, साधारण ३७५ ग्रॅम चांदी आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एसआयटी आता आरोपींच्या उत्पन्नाचे स्त्रोत, बँक खाती, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांचे दुवे जोडत आहे. जप्त रक्कम व मालमत्तेचा देणगीशी काय संबंध आहे, याचा शोध सुरू आहे.
राजकारण तापले: विरोधक आक्रमक
- यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, तपासाची व्याप्ती वाढवून पडताळणी केली जात आहे. कोणत्याही दोषीची गय केली जाणार नाही. आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘अमित शाह अद्याप रामलल्लाच्या दर्शनासाठी गेलेले नाहीत. जे प्रभू रामाच्या नावावर मते मागतात, त्यांनी आधी अयोध्येत गेले पाहिजे.’
- ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आरोप केला की, देणगी चोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंददेव गिरी यांना वाचवले जात आहे. ते म्हणाले, देणगी चोरी हा एक कट आहे.
प्रथमच… ८ आरोपींकडून जप्त रक्कम, ऐवजाचा तपशील जारी
न्यायालयात सादर केलेल्या पंचनाम्यांनुसार, अविनाशकडून ₹~२०.३९ लाख रोख, ११२१ अमेरिकन डॉलर, करुणेश पांडेयकडून ₹~१८.०७ लाख, अनुकल्प मिश्रकडून ₹~१६.८२ लाख, लवकुश मिश्रकडून ₹~१४.२५ लाख, रामशंकर मिश्राकडून ₹~७.३२ लाख आणि रमाशंकर यादव उर्फ टिन्नूकडून ₹~१ लाख जप्त करण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये पहिल्यांदाच प्रत्येक आरोपीकडून जप्त नोटांचा मूल्यानुसार तपशील आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
