
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी रात्री त्यांच्या भवानीपूर मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पोहोचल्या. दिव्य मराठीच्या एका वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांनी सर्व उमेदवारांना आपापल्या विधानसभा स्ट्राँग रूमच्या बाहेर येण्यास सांगितले होते. ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूरच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचल्या आणि तिथे सुमारे १० मिनिटे थांबल्या. यावेळी भाजपचे नेतेही उपस्थित होते. यापूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांनी गुरुवारी संध्याकाळी कोलकाता येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमबाहेर आंदोलन केले. त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीशिवाय मतपेट्या उघडल्या जात असल्याचा पक्षाचा आरोप आहे. टीएमसीने ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, भाजप आणि निवडणूक आयोग उघडपणे निवडणुकीत हेराफेरी करत आहेत.” कोलकाताच्या नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये उभारलेल्या ईव्हीएम स्ट्राँग रूमबाहेर आंदोलन करत बसलेले टीएमसी नेते कुणाल घोष म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सीसीटीव्ही आणि लाईव्हस्ट्रीममध्ये आत काही लोक काम करताना दिसत आहेत, पण टीएमसीच्या कोणत्याही प्रतिनिधीला आत जाऊ दिले जात नाही. त्यांना इतर उमेदवारांशी बोलण्यास सांगितले जात आहे, जे योग्य नाही. आयोगाने सांगितले की, टपाल मतपत्रिकांसाठी एक स्वतंत्र स्ट्राँग रूम उभारण्यात आली आहे, जिथे मतपत्रिकांची छाननी केली जात होती. या प्रक्रियेबद्दल सर्व राजकीय पक्षांना आगाऊ माहिती देण्यात आली होती. ज्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम ठेवलेले आहेत, त्या पूर्णपणे सुरक्षित आणि कुलूपबंद आहेत. ही संपूर्ण परिस्थिती शशी पांजा आणि कुणाल घोष यांना दाखवण्यात आली. ममता म्हणाल्या – भाजपच्या सांगण्यावरून एक्झिट पोल दाखवण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडिओ संदेश जारी करून राज्यात टीएमसी पुन्हा सत्तेवर येईल असा दावा केला. बंगालमधील २९४ पैकी २२६ पेक्षा जास्त जागांवर टीएमसी जिंकेल, असे त्यांनी म्हटले. ममता म्हणाल्या, टीएमसी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आले. निवडणुकीदरम्यान केंद्रीय दलांनी भाजपच्या एजंटप्रमाणे काम केले, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, टीएमसी नेत्यांनी कोलकाता येथील स्ट्राँग रूमबाहेर आंदोलन केले. पक्षाच्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत मतपेट्या उघडल्या जात असल्याचा आरोप पक्षाने केला. टीएमसीने यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, बंगालमध्ये टीएमसीसोबत युती करण्याबाबतचा निर्णय निकालानंतर घेतला जाईल. खरगे म्हणाले, “आता काहीही बोलणे घाईचे ठरेल. बंगालमध्ये स्वतःला मजबूत करण्यासाठी काँग्रेसने एकट्याने लढा दिला.” बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी, मनोज कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, २९ एप्रिल रोजी बंगालमधील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएममध्ये फेरफार केल्याची ७७ प्रकरणे समोर आली आहेत. ज्या मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला आहे, तिथे २ मे पर्यंत फेरमतदान घेण्याचे संकेत त्यांनी दिले. बंगालमध्ये विक्रमी ९२.८४% मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत बंगालमधील सर्व २९४ जागांवर विक्रमी ९२.८४% मतदानाची नोंद झाली. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी, तर केरळम, आसाम आणि पुदुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान झाले. सर्व राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जातील. बुधवारी संध्याकाळी एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आले. बंगालमधील सातपैकी पाच एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन होण्याचा, तर दोन पोलमध्ये टीएमसी सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाचही राज्यांमधील निवडणुकांशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






