digital products downloads

शीतल तेली-उगले यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला: क्रीडा आयुक्त पदावरून बदली; अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदींनी केले स्वागत – Pune News

शीतल तेली-उगले यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला:  क्रीडा आयुक्त पदावरून बदली; अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदींनी केले स्वागत – Pune News



भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीतल तेली-उगले यांनी आज पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्या २००९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्तपदी बदली झाली होती. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी नूतन विभागीय आयुक्तांचे स्वागत केले. तेली-उगले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कला शाखेच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे. प्रशासकीय सेवेदरम्यान, २०२३ मध्ये त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया सरकारांनी अर्थसहाय्यित केलेल्या ‘जलसुरक्षा’ आणि ‘वर्तुळाकार अर्थव्यवस्था’ या विषयांवरील विशेष प्रशिक्षणात ऑस्ट्रेलिया येथे सहभाग घेतला होता. त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात नागपूर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथे सहायक जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी आणि पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे त्यांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि राज्याच्या क्रीडा आयुक्त ही पदेही त्यांनी यशस्वीपणे भूषवली आहेत. रायगड जिल्हाधिकारी असताना, महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत त्यांनी प्रशासनाचे सक्षम नेतृत्व केले. ‘शोध व बचाव’ मोहिमांमधील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच, ‘डिजिटल इंडिया सप्ताह’मध्ये जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला होता. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात, पुणे महानगरपालिकेला ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट’ आणि ‘हुडको अवॉर्ड फॉर बेस्ट प्रॅक्टिसेस’ यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले. ‘जनाग्रह’ या अशासकीय संस्थेच्या मूल्यमापनात पुणे शहराला ‘शहरी प्रशासनातील सर्वोत्तम शहर’ म्हणून मानांकन मिळाले होते. तेली यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने ‘फॅब्रिक ऑफ युनिटी’ मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेअंतर्गत ११०० हून अधिक नागरिकांनी, ज्यात खासदार, आमदार, सनदी अधिकारी, विद्यार्थी आणि कामगार यांचा समावेश होता, हातमागावर ९८ फूट लांबीचे कापड विणले. या कामगिरीची नोंद ‘आशिया अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात, २०२३ मध्ये सोलापूर स्मार्ट सिटीला राष्ट्रपतींच्या हस्ते पश्चिम विभागासाठीचा ‘विभागीय स्मार्ट सिटी पुरस्कार’ मिळाला. ‘पीएम स्वनिधी’ योजनेत २०२४ मध्ये महानगरपालिकेने १२८ टक्के उद्दिष्ट साध्य केले, ज्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ मध्ये महानगरपालिकेने दुसरे बक्षीस पटकावले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp