
कॅफेमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन तरुणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित नबिल कासम शेख (रा. भुसावळ) याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मूळची मध्य प्रदेशातील असलेली पीडिता भुसावळमध्ये आजी-आजोबांकडे राहून शिक्षण घेत होती. इयत्ता दहावीत असताना नबिलने तिच्याशी मैत्री केली. विश्वासाने कॅफेत बोलावून त्याने तिचे नकळत फोटो काढलेउर्वरित. स्पाेर्ट््स इनसाइड स्टोरी – मौलानाकडून बळजबरीने कलमा, ८ दिवस डांबले ८ मार्चला पहाटे नबिलने तरुणीला दुचाकीवरून सुंदरनगर येथे नेले. दुसऱ्या दिवशी कारने दीपनगरमधील एका अज्ञात खोलीत नेऊन तिथे उपस्थित मौलानाकडून बळजबरीने ‘कलमा’ पढवून घेतला. नकार देताच जिवे मारण्याची धमकी दिली आणि मुस्लिम रीतिरिवाजानुसार निकाह लावला. त्यानंतर तब्बल आठ दिवस तिला कोंडून ठेवत बुरखा आणि नमाजसाठी अमानुष मारहाण केली. बातमीतून धडा शालेय वयातच मुलांची मैत्री कॅफेपर्यंत पोहोचते आणि तिथे नकळत काढलेले फोटो ब्लॅकमेलिंगचे हत्यार बनतात. मुलांच्या सोशल मीडिया आणि बाहेरील वावरावर पालकांचे लक्ष असणे किती गरजेचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






