
पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ सोमवारी सकाळी एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सोमवारी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादातून आरोपी बापू भोसले, गणेश गोरे आणि गणेश धरपाळे या तिघांनी सुरज काळे यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केली. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींच्या शोधासाठी भोर आणि वेल्हा परिसरातही पोलिसांची पथके पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस करत आहेत. किरकोळ कारणावरून मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल उधारीच्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी एजाज मोद्दीन जमदार (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून बाळू गोरे, बबन गोरे आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बिबवेवाडीतील जगताप डेअरीमागे घडली. फिर्यादीने आरोपींकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन आरोपींनी फिर्यादीला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादीचा उजवा डोळा लाल झाला असून मानेलाही मार लागला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






