
नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन राज्य शासनाने रद्द केले आहे. त्यांची अमरावती जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर पुनर्रस्थापना करण्यात आली असून, काळुसे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शासनाच्या आदेशानुसार, सिद्धेश्वर काळुसे यांना २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याने हे निलंबन करण्यात आले होते. निलंबनाच्या आदेशात असे नमूद केले होते की, तीन महिन्यांच्या आत विभागीय चौकशी किंवा न्यायिक कार्यवाही सुरू न झाल्यास हे निलंबन आपोआप संपुष्टात येईल. याच अटीनुसार, विभागीय चौकशीच्या अधीन राहून काळुसे यांना अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, काळुसे यांनी नवीन पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारणे अपेक्षित होते आणि तसा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी दिले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/