कठोरा रोडवर आढळला अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह: हत्या की आत्महत्या, तपास सुरू – Amravati News

कठोरा रोडवर आढळला अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह:  हत्या की आत्महत्या, तपास सुरू – Amravati News



अमरावती येथील कठोरा रोडवर एका शाळेजवळ बुधवारी दुपारी एका अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा. ही घटना हत्या आहे की आत्महत्या, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तरुणाने पँट आणि बूट परिधान केले होते, मात्र त्याच्या शरीराच्या वरच्या भागावर कोणतेही कपडे नव्हते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (डीसीपी) यशवंत सोळंके आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. नांदगाव पेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

https://doonitednews.in/advertisement-rate-card/

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »