‘वर्षा’, ‘नंदनवन’, ‘देवगिरी’वर 125 रुपयांत व्हेज थाळी: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील कँटीनमध्ये मेजवानी – Mumbai News

‘वर्षा’, ‘नंदनवन’, ‘देवगिरी’वर 125 रुपयांत व्हेज थाळी:  मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील कँटीनमध्ये मेजवानी – Mumbai News



मुंबईतील ‘वर्षा’, ‘नंदनवन’ आणि ‘देवगिरी’ या राज्याच्या सत्ताकेंद्रे असलेल्या बंगल्यांत आता पाहुणचाराचा नवा बेत रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानांवर येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या आणि अन्य पाहुण्यांच्या खानपानावर राज्य सरकार पुढील चार वर्षांत तब्बल ९.८५ कोटी रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींच्या या कंत्राटात राज्याच्या सर्वोच्च नेत्यांच्या बंगल्यावर मिळणारी ‘व्हेज थाळी’ अवघ्या १२५ रुपयांत, तर चहा २३ रुपयांत मिळणार आहे. सत्तेच्या दरबारातील या ‘स्वस्त आणि मस्त’ जेवणाची सध्या मोठी चर्चा होत आहे. सुरक्षा आणि गोपनीयतेची अत्यंत संवेदनशीलता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ही जबाबदारी मुंबईच्याच ‘श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस’कडे सोपवली आहे. या कंत्राटानुसार, २० जुलै २०२६ ते १९ जुलै २०३० या चार वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘नंदनवन’ आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ‘देवगिरी’ या बंगल्यांवरील खानपान व्यवस्था याच कंपनीला पाहावी लागणार आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय वर्तमानपत्रांत ई-निविदा प्रसिद्ध करून तांत्रिक आणि व्यावसायिक छाननीअंती या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. चिकन सँडवीच २४, तर साधा डोसा १५ रुपयांना पेये व नाष्टा : चहा (दूध) २३ रु., कॉफी १६ रु., ग्रीन किंवा मसाला टी २० रु., कोल्ड ड्रिंक्स १५ रु. पोहा, उपमा, शिरा, इडली किंवा वडा सांबर प्रत्येकी ३५ रु., बटाटा वडा ३२ रु., दही मिसळ १५ रु., पावभाजी २२ रु., व्हेज सँडवीच १८ रु., चिकन सँडवीच (ग्रील्ड) २४ रु., इतर नाष्टा अवघ्या १५ आणि २० रुपयांत तर साधा डोसा, उत्तप्पा, दही वडा, साबुदाणा वडा, कचोरी, व्हेज कटलेट, समोसा, ढोकळा किंवा कोथिंबीर वडी अवघ्या १५ रुपयांत मिळेल. मसाला डोसा २० रुपयांत मिळेल. असे असतील पदार्थांचे दर जेवण व बिर्याणी : व्हेज थाळी (फुल) १२५ रु., नॉन-व्हेज थाळी (फुल) १३० रु., व्हेज बिर्याणी २५ रु., तर चिकन किंवा मटण बिर्याणी ३५ रु. व्हेज फ्राइड राइस २० रु., नॉन-व्हेज फ्राइड राइस २२ रु.
व्हीआयपी व व्हीव्हीआयपी बुफे : व्हीआयपी ब्रेकफास्ट बुफे १५० रु., स्पेशल स्नॅक्स ५० रु., व्हीआयपी हाय-टी ७० रु., व्हीव्हीआयपी स्पेशल व्हेज बुफे (लंच अथवा डिनर) ५२० रु., स्पेशल नॉन-व्हेज बुफे ६२० रु., तर व्हेज-नॉनव्हेज मिक्स बुफे ७२० रु.
गोड पदार्थ : रसगुल्ला किंवा गुलाबजामून २० रु., रसमलाई १७ रु., उकडीचे मोदक १५ रु., काजू मोदक १७ रु., स्पेशल पेढा १५ रु., सुका मेवा २५ रु., फ्रूट डिश किंवा फ्रूट सॅलड १५ रु. कंत्राटदारास वीज, पाणी बिल प्रचलित दरानुसार राज्य सरकारच्या नियम आणि अटींनुसार, कंत्राटदाराला एकूण मूल्याच्या ३ टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून १५ दिवसांच्या आत जमा करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उपाहारगृहाची जागा, वीज आणि पाण्याचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित दरानुसार कंत्राटदाराकडून आकारले जाणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »