‘भाजपचा DNA आता ओबीसींचा राहिला नाही, कारखानदारांचा झालाय’: लक्ष्मण हाकेंचा घणाघात; नव्या राजकीय पक्षाचीही केली घोषणा – Mumbai News

‘भाजपचा DNA आता ओबीसींचा राहिला नाही, कारखानदारांचा झालाय’:  लक्ष्मण हाकेंचा घणाघात; नव्या राजकीय पक्षाचीही केली घोषणा – Mumbai News



ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात ओबीसी समाजाचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. लक्ष्मण हाके यावेळी बोलताना म्हणाले की, भाजपचा डीएनए हा ओबीसी राहिला नाही, आता कारखानदारांचा झाला आहे. भाजपने पक्ष फोडाफोडी केली याचे समर्थन नाही, मात्र आता काही गरज नसताना त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घ्यायची तसेच शिवसेना फोडण्याची काय गरज होती? असा सवाल हाके यआणि उपस्थित केला आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, देशात वेगवेगळ्या राजकीय घटना घडत आहेत. दुसऱ्या बाजूला वारी सुरू आहे. पांडुरंगाकडे एकच मागणे आहे, महापूजेला मुख्यमंत्र्यांना एकच सदबुद्धी मिळावी की फोडाफोडी बंद करावी. आता सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात करा, सत्ता येऊन बरेच दिवस झाले आहेत, असे हाके यांनी म्हटले आहे. भाजपला सत्तेतजाण्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज होती. मात्र अजितदादांच्या गटाची काय गरज होती? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, एकदा तुम्ही ममता बॅनर्जीचा पक्ष फोडता, उरलासुरला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडता. उद्धव ठाकरेंचे खासदार तर जी लाखम फुटली त्यांच्या विरोधात निवडून आले आणि तेच परत शिंदेंकडे गेले. भाजपचा डीएनए आता कारखानदारांचा झाला आहे. भाजपचा डीएनए आता प्रसाद लाड आहे, प्रवीण दरेकर आहे, अशी टीका हाके यांनी केली आहे. सत्ता येत असतात जात असतात मुख्यमंत्री येत असतात जात असतात. पण मी ज्या प्रवर्गाची भाषा बोलतोय त्याच्या शोषणावर राष्ट्रवादीने काय केलं ते मला सांगा. राष्ट्रवादीनं कोणता लढा उभारलाय ते मला सांगा. राष्ट्रवादी नेमही सत्तेच्या वळचणीला गेले. कारखाने काढले, उद्योगपतींशी साटलोटं केलं. दोन्ही राष्ट्रवादी एक आहेत. निवडणुका लढल्या तरी हे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. हे लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे कुणी सांगितले? असे प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »