प्रिय आई-बाबा, आजच पुनरीक्षण अर्ज भरा: विद्यार्थी लिहीणार पालकांना पत्र, हिंगोलीत अनोखा उपक्रम – Hingoli News

प्रिय आई-बाबा, आजच पुनरीक्षण अर्ज भरा:  विद्यार्थी लिहीणार पालकांना पत्र, हिंगोलीत अनोखा उपक्रम – Hingoli News



प्रिय आई, बाबा, पत्रास कारण की, माझे वय १८ वर्ष झाले नाही त्यामुळे मला मतदान करता येत नाही पण १८ वर्षानंतर मी आपल्या देशाची जबाबदार मतदार होईल. जिल्हात मतदान पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याचे मला शाळेत काळाले, तुम्ही देखील हा अर्ज भरून घ्या. त्यामुळे मला माझे नांव मतदार यादीत समाविष्ट करणे सोपे होईल अशा आशयाचे पत्र जिल्हयातील सुमारे १ लाख विद्यार्थी त्यांच्या पालकांना पाठविणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेला व्यापक लोकसहभाग मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विशेष जनजागृती उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना मतदार नोंदणी व पडताळणीबाबत जागृती करणारे पत्र पाठविण्यात येणार आहे. या पत्राद्वारे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार असून, प्रत्येक कुटुंबाने बीएलओ यांना आवश्यक सहकार्य करून गणना प्रपत्र अचूक भरावे, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचणारा हा संदेश मतदार जनजागृतीसाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात शिक्षण विभाग, सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून, विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पत्र पोहोचवून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले जाणार आहे. या उपक्रमात जिल्हयातील सुमारे १ लाख विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp