
सातारा–कास मार्गावरील एकीव फाटा परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने एक जण गंभीर, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास महर्षी महेश मारुती पिसाळ (रा. इंदिरानगर, विलासपूर, ता. जि. सातारा) हे कार चालवत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली. या अपघातात राहुल अण्णा ननवरे (रा. कारंडवाडी, पोस्ट देगाव, ता. जि. सातारा) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वैभव किसन जाधव (रा. सासपडे, ता. जि. सातारा) आणि चालक महर्षी पिसाळ यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि मार्गावरील प्रवाशांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेमुळे सातारा–कास मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली असून हवालदार किशोर वायदंडे पुढील तपास करत आहेत. हे ही वाचा… कोल्हापुरात भरदिवसा गोळीबाराचा थरार:भाजप कार्यकर्त्यावर दोघांनी झाडल्या गोळ्या; खासगी सावकारकीच्या वादातून हल्ल्याचा संशय कोल्हापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नवी वाशी नाका परिसरात भाजपचे कार्यकर्ते सुरज साखरे यांच्यावर दोन अज्ञातांनी भरदिवसा गोळीबार केला. या हल्ल्यात साखरे जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
