लातूरमध्ये खळबळ: प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळल्या इंजेक्शनच्या बाटल्या – Maharashtra News

लातूरमध्ये खळबळ:  प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळल्या इंजेक्शनच्या बाटल्या – Maharashtra News



लातूर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि एम.जे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मेहुल राठोड (वय ४५) यांचा त्यांच्याच कारमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर-अंबाजोगाई रोडवर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. कारमध्ये गुंगीच्या औषधांची इंजेक्शन्स सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे लातूरसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दुपारी अचानक संपर्काबाहेर डॉ. मेहुल राठोड यांचे लातूरमधील बार्शी रोडवर ‘एम.जे. हॉस्पिटल’ नावाचे मोठे रुग्णालय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ते आपली कार घेऊन अचानक रुग्णालयातून बाहेर पडले आणि थेट अंबाजोगाई रोड भागात आले. दुपारी दीड वाजेपासून त्यांची कार तिथेच उभी असल्याचे काहींनी पाहिले होते. दुसरीकडे, दुपारपासून त्यांच्या कुटुंबाकडून आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना सतत फोन केले जात होते, मात्र ते कोणताही प्रतिसाद देत नव्हते. कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले डॉक्टर डॉ. राठोड फोन उचलत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांची शोधाशोध सुरू झाली. संध्याकाळच्या सुमारास त्यांची कार अंबाजोगाई रोड परिसरात उभी असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. स्वतः डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नी आणि रुग्णालयातील काही सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कारमध्ये डॉ. राठोड हे गंभीर अवस्थेत आढळले. त्यांच्या आजूबाजूला काही गुंगीच्या औषधांच्या रिकाम्या बाटल्या आणि इंजेक्शन्स पडलेली दिसून आली. त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत स्पॉट पंचनामा केला. कारमधील परिस्थिती पाहता, त्यांनी स्वतःला गुंगीचे इंजेक्शन देऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, इतक्या मोठ्या आणि यशस्वी डॉक्टरने असे टोकाचे पाऊल अचानक का उचलले, याचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत असून, शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. हेही वाचा.. मोठा निर्णय!: अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा आदेश जारी राज्य सरकारने दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासनादेश जारी केला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे अधिकृत आदेश राज्य शासनाने जारी केले. शासनाच्या या निर्णयामुळे अजितदादांच्या लोकसेवेचा वारसा आता अधिकृतपणे जपला जाणार आहे. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp