संजय राऊत आता ‘संपत राऊत’ झालेत: हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेस-उबाठाचा डाव हाणून पाडू- नवनाथ बन – Mumbai News

संजय राऊत आता ‘संपत राऊत’ झालेत:  हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेस-उबाठाचा डाव हाणून पाडू- नवनाथ बन – Mumbai News



संजय राऊत यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय सुरू आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. जनतेने त्यांच्या पक्षाला अडगळीत टाकले आहे. संजय राऊत हे आता ‘संपत राऊत’ झाले असून त्यांनी भाजपच्या अडचणी शोधण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपची वाटचाल सुरळीत सुरू असल्याचे सांगत त्यांनी राऊत यांच्यावर ‘सुपारी बाज’ असल्याचा आरोपही केला. नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाचे सध्याचे आंदोलन हे काँग्रेसकडून ‘सुपारी’ घेऊन सुरू आहे. देशातील हिंदू एकत्र आलेला काँग्रेसला बघवत नाही. म्हणूनच राम मंदिराचा कथित मुद्दा पुढे करून, काँग्रेसच्या इशाऱ्यावरून उद्धव ठाकरे हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू बांधवांमध्ये फूट पाडण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. मंदिराच्या मुद्द्यावर आमच्या भावना तीव्र आहेत. ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. रामभक्त सजग आहेत, तुमच्यासारख्या रावणांनी हिंदूंमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. राऊतांनी प्रमाणपत्र वाटू नये नवनाथ बन म्हणाले की, सांगलीमध्ये कोणाचे नेतृत्व सक्षम आहे, याचा निर्णय सांगलीकरांनी आधीच केला आहे. जयंत पाटील यांना कोणी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. आमच्या गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत त्यांच्यावर केलेले भाषण सर्वांनी ऐकले आहे. ज्यांना आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात सांगली-मिरज रस्ता करता आला नाही, त्यांनी सांगलीचे नेतृत्व करू नये, असा सणसणीत सल्ला पडळकरांनी दिला आहे. तुमच्या काळात जे झालं त्यालाच ‘स्टेट कॅप्चर’ म्हणतात नवनाथ बन म्हणाले की, मविआच्या काळात रोज 100 कोटी रुपयांची वसुली सुरू होती, हा खरा ‘स्टेट कॅप्चर’चा नमुना होता. केंद्रीय मंत्र्यांना राज्यात अटक करणे, लोकप्रतिनिधींच्या घरांवर बुलडोझर पाठवणे आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकणे हे मविआचेच उद्योग होते. कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात कमिशन खाणे यालाच ‘स्टेट कॅप्चर’ म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला. तो पैसा जनतेचाच होता नवनाथ बन म्हणाले की, पत्राचाळीत जेव्हा राऊतांनी पैसे लुटले, ते जनतेचे पैसे नव्हते का? मविआचे सरकार असताना रोज वसुलीचे जे टार्गेट दिले होते, तो जनतेचाच पैसा होता. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेस न्यायालयात गेली होती आणि राऊतही कोर्टात जाण्याच्या धमक्या देत होते. मात्र, महायुती सरकार ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. या योजनेत विरोधकांनी जाणीवपूर्वक बोगस लाभार्थी (पुरुष) घुसवण्याचा प्रयत्न केला असून, अशा बोगस पुरुषांची ओळख पटवून त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp