मोशी कचरा डेपो दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश – Pune News

मोशी कचरा डेपो दुर्घटना:  मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश – Pune News



पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत निधी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला होता. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी रविवारी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली होती. या घटनेमुळे इमारतीत आणि इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनेक नागरिक अडकले होते. एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनेनंतर पाच नागरिक स्वतः बाहेर आले, तर उर्वरित १८ पैकी ९ नागरिकांना बचाव पथकाने इमारतीतून बाहेर काढले. या दुर्घटनेत भावेश वाणी (वय ३३), अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी), राहुल गायकवाड (वय २३, मोशी) आणि वामन कसबे (वय ५०, मोशी) या ९ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. ही मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दुर्घटनेप्रकरणी आयुक्तांचे चौकशीचे आदेश दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी रविवारी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत २२ तर इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. या पैकी इमारतीतून पाच नागरिक सुखरुप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. यामध्ये इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. तर या घटनेत इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या घटनेच्या सखोल चौकशी आदेश दिले आहेत. या संदर्भात आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्काळ महापालिकेचा पर्यावरण विभाग व संबंधित ठेकेदार कंपनी यांना नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp