ईडीला घाबरून पळालेले तुम्ही भित्रे आणि गद्दार!: सिद्धिविनायक व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात – Mumbai News

ईडीला घाबरून पळालेले तुम्ही भित्रे आणि गद्दार!:  सिद्धिविनायक व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात – Mumbai News

सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरी, हिंदुत्व आणि शिवसेना फोडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर खासदारांवर सडकून टीका केली आहे. तसेच, खासदार शरद पवार यांच्या पक्षा

.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा अरविंद सावंत यांनी खरपूस समाचार घेतला. “सर्वांत आधी, त्यांना (एकनाथ शिंदे) हे बोलण्याचा अधिकार आहे का? हे त्यांनाच जाऊन विचारा. उद्धव साहेबांनी नेहमीच प्रभू रामचंद्रांचे नाव घेतले आहे. जर तुमच्या मनात हिंदुत्वाबद्दल एवढाच उमाळा आणि तीव्र भावना होत्या, तर मग तुम्ही अडीच वर्षे त्यांच्यासोबत सत्तेत का राहिलात? अडीच वर्षे सत्तेचा उपभोग का घेतलात? अडीच वर्षांनंतर तुम्हाला याची जाणीव झाली का?” असे तिखट सवाल सावंत यांनी उपस्थित केले. बंडखोरांच्या हेतूवर बोट ठेवत ते पुढे म्हणाले, “तुम्ही तर ईडीला (ED) घाबरून पळून गेलेले लोक आहात. तुम्ही भित्रे आहात, तुम्ही गद्दार आहात.”

शरद पवारांना समजणे कठीण, पण सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अस्वस्थ असून पक्षात मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर भाष्य करताना सावंत म्हणाले, “खासदार शरद पवार साहेबांना समजणे अत्यंत कठीण आहे. त्यांना ओळखणे सोपे नाही. मी एवढेच सांगेन की हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण या सर्व चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले विधानही आपण लक्षात घ्यायला हवे.”

“कालच माझी सुप्रिया सुळेंशी भेट झाली. मी स्वतः त्यांना या सुरू असलेल्या चर्चांबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी ‘तसे काहीही नाहीये, या केवळ अफवा आहेत’ असे स्पष्ट केले आहे.”

दोन तृतीयांश ‘पक्ष’ जावा लागतो, गट नाही; अध्यक्षांनाही तो अधिकार नाही

शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी जून महिन्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतःला अधिकृत गट म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती. यावर संविधानाचा दाखला देत सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष आणि बंडखोरांना कायदेशीर मुद्यांची आठवण करून दिली.

“संविधानात याविषयी स्पष्ट तरतूद आहे, तिचे उल्लंघन करू नका. संविधानाचा आदर राखून तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. पण कोणत्याही फुटीर गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देण्याचा अधिकार तुम्हाला किंवा लोकसभा अध्यक्ष बिर्ला साहेबांना नाही. कारण, कायद्यानुसार दोन तृतीयांश ‘पक्ष’ (मूळ पक्ष आणि संघटना) जावा लागतो, केवळ दोन तृतीयांश ‘गट’ (आमदार/खासदारांचा गट) जाऊन चालत नाही. केवळ एका गटाला कधीही मूळ पक्षाची मान्यता मिळत नसते,” असे अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितले.

हे ही वाचा…

सिद्धिविनायकचा मुद्दा चार वर्षांपूर्वीच आम्ही मांडला होता:सरकार राम मंदिरावरील लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय, यशवंत किल्लेदारांचा हल्लाबोल

सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते यशवंत किल्लेदार यांनी राज्य सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा आपण साडेतीन ते चार वर्षांपूर्वीच उपस्थित केला होता, असा दावा करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावरील लक्ष विचलित करण्यासाठीच हा जुना मुद्दा पुन्हा पुढे आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा…

एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही:अमित शाह एका पायावर उभं राहायला सांगतील तर तसंही करतील, कन्हैया कुमारांची जहरी टीका

ईडीला घाबरून पळालेले तुम्ही भित्रे आणि गद्दार!: सिद्धिविनायक व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात - Mumbai News

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), उत्तर प्रदेश सरकार आणि मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही वैयक्तिक टीका करत, “अमित शाह यांनी एका पायावर उभं राहायला सांगितलं तर ते तसेही उभे राहतील,” असा टोला लगावला. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)