
हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत तालुक्यांमध्ये वारंवार घडणाऱ्या भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी तारीख 9 विधान परिषदेत केली आहे.
.
वसमत तालुक्यामध्ये पांगरा शिंदे व परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे परिसरातील गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या भागात पाहणी करावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. वसमत, कळमनुरी तालुक्यामध्ये मागील काही दिवसात भूकंपाचे धक्के जाणवत असून भूगर्भातून आवाजही होऊ लागले आहेत. गुरुवारी तारीख 9 पहाटेच्या सुमारास या परिसरात सलग चार भूकंप झाले आहेत. एकाच वेळी चार भूकंप झाल्यामुळे गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपग्रस्त भागात गावकऱ्यांनी अक्षरशः रात्र जागून काढले आहे. या भूकंपामुळे परिसरातील काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक घरांना तडे गेले आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
कळमनुरी व वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात मागील काही दिवसात सातत्याने भूकंप व भूगर्भातून आवाज होण्याचे प्रकार वाढले आहेत. शासनाने भूकंपाच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक असून त्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करावी या समितीमार्फत परिसरात भेटी देऊन भूकंपाच्या कारणांचा शोध घ्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेत केली आहे.
दरम्यान आमदार डॉक्टर सातव यांनी विधान परिषदेत भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता शासनाकडून लवकरच तज्ञ शास्त्रज्ञांची समिती स्थापन करून या भागात पाहणी केली जाईल अशी अपेक्षा गावकऱ्यातून व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा…
मराठवाडा हादरला:हिंगोलीसह परभणी-नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, मध्यरात्री जमीन हादरल्याने नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमधील अनेक भागांत मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीतील शिरळी परिसरात 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. सविस्तर वाचा…
हिंगोलीत अवैध सावकारीवर धडक कारवाई:11 खरेदीखत, 9 कोरे बाँड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोळी निळोबा येथे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या पथकाने गुरुवारी ता. ९ सकाळी सात वाजता अवैध सावकारीच्या संशयावरून एका घरावर छापा टाकला. यामध्ये ११ खरेदीखत, ९ कोरे बॉण्ड, पाच चिठ्ठा, सात कॅलेंडर व इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
