लोणावळ्यात भीषण भूस्खलन: मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू – Pune News

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:  मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू – Pune News



राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या धोक्यात आणखी भर पडली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. उपविभागीय अधिकारी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू असून, मातीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे, पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर कलम 163 लागू केले असून, पर्यटनावर काही कडक निर्बंध घातले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) देखील दरड कोसळण्याची मोठी घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर प्रशासनाने तत्परता दाखवत तातडीने कार्यवाही करून दरड हटवण्याचे काम पूर्ण केले. मात्र, या आपत्कालीन परिस्थितीमुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल 24 तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथील वाहतूक पोलिस चौकीसमोर डोंगरावरील दरडीचा मोठा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून मोठे दगड, माती आणि झाडे रस्त्यावर आल्याने या भागात भूस्खलनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गोव्याकडे जाणारी वाहतूक त्वरित थांबवली असून ती दुसऱ्या लेनने वळवली आहे. मात्र दरड कोसळण्याचे सत्र अद्याप सुरूच असल्याने मातीचा आणखी मोठा ढिगारा रस्त्यावर येऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp