आज हिंगोलीत रिंगण: नर्सीतून संत नामदेव महाराज पालखीचे‎प्रस्थान; 19 दिवसांनी पंढरीत पोहोचणार‎ – Hingoli News

आज हिंगोलीत रिंगण:  नर्सीतून संत नामदेव महाराज पालखीचे‎प्रस्थान; 19 दिवसांनी पंढरीत पोहोचणार‎ – Hingoli News



संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या‎नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या‎पायी पालखी सोहळयाचे रविवारी पंढरपूरकडे‎प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक‎पालखी सोहळ्यात सहभागी झाले. आज‎हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे,‎पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. ३५० किमी अंतर‎पायी कापून २४ जुलैला पालखी पंढरपूरला‎पोहोचणार आहे.‎ नर्सी नामदेव येथून दुपारी ‘जय जय रामकृष्ण‎हरी’च्या गजरात पालखी निघाली. यावेळी‎संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन करण्यात‎आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने‎उपस्थिती होती. पालखी सोहळ्यात चालक‎प्रमुख म्हणून बळीराम सोळंके काम पाहणार‎आहेत. या पालखी सोहळ्यात किर्तनकार,‎गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य सहभागी झाले‎आहेत. पालखी सोहळ्याचे पूजन झाल्यानंतर‎गावातून नगर प्रदक्षिणा घेण्यात आली. या‎पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी‎झाले असून पालखी सोहळा सोमवारी दुपारी‎हिंगोलीत पोहोचणार आहे. त्यानंतर रामलिला‎मैदानावर पहिले रिंगण होणार आहे.‎ पालखीचा मुक्काम असा‎ ७ जुलै औंढा नागनाथ, ८ जुलै बाराशिव, ९‎जुलै हट्टा, १० जुलै परभणी, ११ जुलै‎पोखर्णी, १२ जुलै गंगाखेड, १३ जुलै‎उक्कडगाव, १४ जुलै परळी वैजनाथ, १५‎जुलै अंबाजोगाई, १६ जुलै बोरी सावरगाव,‎२० जुलै खांडवी, २१ जुलै चिंचगाव‎(टेकडी), २२ जुलै लहुळ, २३ जुलै आष्टी,‎२४ ते २९ जुलै पंढरपूर.‎ आज पालिकेतर्फे स्वागत‎ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी‎हिंगोली पालिकेच्या वतीने जय्यत तयारी‎करण्यात आली असून नांदेडनाका येथे‎नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या हस्ते‎पालखीचे पूजन करून स्वागत केले‎जाणार आहे. यावेळी आमदार तान्हाजी‎मुटकुळे, आमदार संतोष बांगर, गटनेते‎श्रीराम बांगर उपस्थित राहणार आहेत.‎ पाच ठिकाणी होईल रिंगण‎ या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण‎आज ६ जुलैला हिंगोली येथे होणार‎आहे. त्यानंतर १२ जुलैला सकाळी ९‎वाजता दैठणा, १४ जुलै दुपारी ४‎वाजता परळी वैजनाथ, १५ जुलै‎दुपारी ४ वाजता अंबाजोगाई, १७ जुलै‎सकाळी १० वाजता जवळबन येथे‎रिंगण होणार आहे.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp