
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना महापौर रितू तावडे यांनी वरळी सी-फेस परिसराची पाहणी करून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या पाहणीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाक
.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, “भाजपचा ड्रामा काही संपत नाही. अधिकारी आणि छायाचित्रकारांचा ताफा घेऊन दिखावा करण्यापेक्षा महापौरांनी मुंबई चालवण्यावर लक्ष केंद्रित करावे.”
याचबरोबर त्यांनी टोला लगावत, “आशा आहे की, तिथे उपस्थित असलेल्या लोकांना बांगलादेशी म्हणणार नाहीत किंवा पावसात फिरणाऱ्या मुंबईकरांमध्ये कोणते षड्यंत्र शोधणार नाहीत,” असेही म्हटले.
महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?
मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असून शनिवारी दुपारी 2.50 वाजता ४.२६ मीटर उंच भरती आली. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्ग (कोस्टल रोड – दक्षिण) येथील वरळी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी अनेक नागरिक प्रशासनाच्या वारंवार सूचना असूनही समुद्रकिनाऱ्यावर आणि कठड्यांवर बसून लाटांचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. तावडे यांनी स्वतः वाहनातून उतरून नागरिकांना तेथून तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.
त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “समुद्राच्या प्रचंड लाटा किनाऱ्यावर धडकत असताना असा धोका पत्करणे योग्य नाही. स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव महत्त्वाचा आहे. कृपया प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा आणि सुरक्षित राहा.”
आपत्ती नियंत्रण कक्षालाही दिली भेट
दरम्यान, मुंबईसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षालाही भेट दिली. पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.
रेड अलर्ट लक्षात घेऊन ४ जुलैच्या दुपारच्या सत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापौरांच्या पाहणीवरून आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हे ही वाचा…
6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सविस्तर बातमी वाचा…
राज्यात आडवातिडवा पाऊस:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर

राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
