कोकणसह मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’: 4 ते 6 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा; पालघर आणि कल्याण-डोंबिवलीत शाळांना सुट्टी – Mumbai News

कोकणसह मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’:  4 ते 6 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा; पालघर आणि कल्याण-डोंबिवलीत शाळांना सुट्टी – Mumbai News


राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू ठेवली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाने ४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत

.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्भवू शकणारी पूरस्थिती आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. पालघर जिल्ह्यात शनिवारपासून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात शनिवार (४ जुलै) आणि रविवारी ‘रेड अलर्ट’ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या (राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, सीआईई) प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक

संकटसमयी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी विविध महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आपले २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत.

  • मुंबई (BMC) हेल्पलाईन: १९१६
  • ठाणे महानगरपालिका: ०२२-२५३६४७७९, ०२२-२५३०१७४०, +९१ ९३७२३ ३८८२७
  • ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन: १८००-२२२-१०८ / ८६५७८८७१०१
  • पालघर जिल्हा नियंत्रण कक्ष: ०२५२५-२९७४७४, +९१ ८२३७९ ७८८७३
  • पनवेल महानगरपालिका: ०२२-२७४५८०४० / ४१ / ४२

पावसाची आजची आकडेवारी (सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत)

राज्यात आज ठिकठिकाणी झालेल्या पावसाची नोंद खालीलप्रमाणे आहे.

  • महाबळेश्वर: ८५ मिमी
  • कुलाबा (मुंबई): ३७ मिमी
  • माथेरान / नवी मुंबई: ३० मिमी
  • सातारा: १८ मिमी
  • नाशिक: १६ मिमी
  • रत्नागिरी: १३ मिमी
  • पुणे / कोल्हापूर: १२ मिमी

हे ही वाचा…

सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी:महाबळेश्वरात 70 मिमी, कोयना धरणातील उपयुक्त साठा 9.39 टीएमसीवर

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, घाटमाथ्यासह महाबळेश्वर, नवजा, कोयनानगर आणि पाटण परिसरात संततधार सुरू आहे. महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासांत ७० मिमी पावसाची नोंद झाली असून, कोयना धरणातील पाणीसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज ते रेड अलर्ट जारी केला आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)