अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची 74 लाखांची फसवणूक: सायबर चोरट्यांविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Pune News

अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची 74 लाखांची फसवणूक:  सायबर चोरट्यांविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Pune News



पुण्यात सायबर चोरट्यांनी अटकेची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची 74 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड भागात राहणाऱ्या 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे भासवले आणि तक्रारदाराच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाल्याचे सांगितले. अटकेची कारवाई करण्याची धमकीही दिली. चोरट्यांनी या प्रकाराची माहिती कोणालाही न देण्यास सांगितले. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तातडीने त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात 74 लाख रुपये जमा केले.पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी आणखी एका ज्येष्ठ नागरिकाची 55 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वेनगर भागात राहणाऱ्या 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी पैसे जमा केले, मात्र चोरट्यांनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp