झाड पडणार हे आधी कसं कळणार?: चेंबूर दुर्घटनेनंतर मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून नवा वाद, विरोधक आक्रमक – Mumbai News

झाड पडणार हे आधी कसं कळणार?:  चेंबूर दुर्घटनेनंतर मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून नवा वाद, विरोधक आक्रमक – Mumbai News

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. “झाड पडणे किंवा वीज पडणे या गोष्टी माणसाच्या हातात

.

सरकार सभागृहात भूमिका मांडणार

घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी सुरुवातीला ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले की, सरकार या प्रकरणावर विधानसभेत निवेदन करणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, विरोधकांनी मान्सूनपूर्व तयारी आणि वृक्ष सर्वेक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिरसाट म्हणाले, “झाड पडणे ही नैसर्गिक बाब आहे. कधी जोराचा वारा आला तर झाड पडू शकते. कोणते झाड कधी पडेल, हे आधी सांगता येत नाही.”

‘वृक्षांचे ऑडिट होतेच’

झाडांचे नियमित सर्वेक्षण (ऑडिट) केले जाते का, असा प्रश्न विचारण्यात आला असता शिरसाट यांनी, “ऑडिट तर केले जाते,” असे उत्तर दिले.

स्थानिक नागरिकांनी मात्र संबंधित परिसरात वृक्ष तपासणी व्यवस्थित झाली नसल्याचा आरोप केल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर शिरसाट यांनी, “असं नाही. काम सुरूच असतं. झाड पडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे,” असे सांगितले.

तथापि, या घटनेबद्दल सरकारला अत्यंत दुःख असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

अपघाताशी संबंधित 2 फोटो…

झाड पडल्यानंतर बसचा पुढचा आणि मधला भाग पूर्णपणे चेपला होता.

११ वर्षांचा विहान बसमध्ये अडकला होता, त्याला वाचवून रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

११ वर्षांचा विहान बसमध्ये अडकला होता, त्याला वाचवून रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरकारवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते क्लाईड कॅस्ट्रो यांनी शिरसाट यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली. एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया देणे अत्यंत असंवेदनशील आणि लाजिरवाणे असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांच्या मते, मान्सूनपूर्व वृक्षांचे ऑडिट आणि धोकादायक झाडांची छाटणी करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यात हलगर्जीपणा झाला का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणी केली. विधानसभेत सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

महापौरांचा दावा; छाटणी झाली होती

मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी संबंधित रस्त्यावर झाडांची छाटणी करण्यात आली होती, असा दावा केला. मात्र, ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले.

या दुर्घटनेत बाधित कुटुंबांना महानगरपालिका आर्थिक आणि इतर आवश्यक मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचवेळी, स्थानिक नागरिकांकडून या झाडाबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोपही समोर आला आहे.

राज्यभर वृक्ष सुरक्षा सर्वेक्षणाची घोषणा

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या घटनेनंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यालगतच्या जुनी, कमकुवत आणि धोकादायक झाडांचे विशेष सुरक्षा सर्वेक्षण तातडीने करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

‘दोषींवर कठोर कारवाई होईल’

राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी या घटनेला दुर्दैवी संबोधत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप आमदार संजय उपाध्याय यांनीही ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हटले. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची वेळेत छाटणी करणे आणि जीर्ण झाडे हटविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “झाडांचे संवर्धन महत्त्वाचे आहे, पण मानवी जीवन त्याहून अधिक मौल्यवान आहे,” असेही ते म्हणाले.

नेमकी काय घडली होती?

मंगळवारी दुपारी चेंबूरमधील रोड क्रमांक ११ परिसरात सुमारे ७० वर्षे जुने झाड अचानक उन्मळून शाळेच्या बसवर कोसळले. त्या वेळी बसमध्ये १२ विद्यार्थी होते. स्थानिक नागरिक, बस चालक, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.

या दुर्घटनेत ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेनंतर मान्सूनपूर्व वृक्ष तपासणी, धोकादायक झाडांचे व्यवस्थापन आणि महानगरपालिकेच्या तयारीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संबंधित बातमी वाचा…

चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

झाड पडणार हे आधी कसं कळणार?: चेंबूर दुर्घटनेनंतर मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून नवा वाद, विरोधक आक्रमक - Mumbai News

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp