जिद्द, चिकाटीने यशाचे शिखर गाठता येते: ठाणेदार राहुल आठवले यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन – Amravati News

जिद्द, चिकाटीने यशाचे शिखर गाठता येते:  ठाणेदार राहुल आठवले यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन – Amravati News



विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास तसेच गुरु व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाचा आदर केल्यास ते यशाचे शिखर सहज गाठू शकतात, असे प्रतिपादन ठाणेदार राहुल आठवले यांनी केले आहे. मोर्शी येथे नवनीत डायनामिक व आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आठवले यांनी विद्यार्थ्यांना या सूत्राचा अवलंब करण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम साबू मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, ज्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रजनीश बांबोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार राहुल आठवले यांच्यासह आकाश इन्स्टिट्यूटचे डेप्युटी रिजनल डायरेक्टर राहुल त्यागी, निशिंत तिवारी, विकास रंजन, बालरोगतज्ञ डॉ. विवेक साबळे, हृदयरोगतज्ञ डॉ. सागर श्रीराव, अमित पांडे आणि पत्रकार अजय पाटील उपस्थित होते. आठवले पुढे म्हणाले की, आजचा विद्यार्थी उद्याचा देश घडवणारा महत्त्वाचा घटक आणि आदर्श नागरिक आहे. त्यांनी आई सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून एमपीएससी, युपीएससीसारख्या परीक्षा उत्तीर्ण करून भविष्यात मोठे अधिकारी बनून मोर्शी शहराचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावर्षी संस्थेतील ३३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करून मोर्शी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी डॉ. सागर श्रीराव, डॉ. विवेक साबळे आणि प्रा. रजनीश बांबोळे या मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नवनीत डायनामिक इन्स्टिट्यूटचे संचालक विनोद गेडाम यांनी केले. प्रास्ताविक मोहन मळसने यांनी केले, पीपीटी प्रेझेंटेशन जीवन देशमुख यांनी दिले, तर आभार अनंत नवघरे यांनी मानले. यावेळी अमर गेडाम, पंकज रोडे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp