शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी: विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम – Amravati News

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:  विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम – Amravati News



मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी अध्यापन करावे की शाळाबाह्य कामे करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने (विज्युक्टा) एसआयआरच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विज्युक्टाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांनी थेट राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना यासंदर्भात निवेदन पाठवले आहे. शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचा भडीमार होत असल्याने अध्यापनावर विपरीत परिणाम होत असल्याच्या काही नोंदी या निवेदनात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ३० जूनपासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. शासनाने अलीकडेच जनगणनेच्या कामात सर्व शिक्षकांच्या सेवा घेतल्या होत्या. संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांनी जनगणनेचे काम केले असून, पुढील टप्प्यावरही हे काम सुरूच आहे. याशिवाय, २७ जून रोजी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रानुसार, मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाकरिता शिक्षकांच्या सेवा त्यांच्या सुटीकाळात किंवा दैनंदिन शैक्षणिक कामकाजानंतर घेण्यास सांगितले आहे. मात्र, सध्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांकडे शालेय विभागाच्या माहितीचा प्रचंड व्याप असल्याने ते शैक्षणिक कार्यानंतरही सतत कामात व्यस्त असतात. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी इतर कामे त्यांच्यावर लादली जात असल्याने शाळाकार्य आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करावी, या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम १३ (ब) २ नुसार, राज्यघटनेने पुनरिक्षणाची जबाबदारी निश्चित केली आहे आणि या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त केले जाते. यामध्ये शिक्षक नसावेत असे नसले तरी, ज्यांच्याकडे आधीच अध्यापनाची जबाबदारी आहे, त्यांना अशा कामात का गुंतवावे, हा खरा प्रश्न आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp