राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी: अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी – Amravati News

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:  अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी – Amravati News



राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात (डीपीसी सभागृह) दुपारी १२ वाजता ही सुनावणी सुरू होईल. महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित सर्व तक्रारींवर त्या पीडित महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. महिला व बालविकास विभागाने या जनसुनावणीसाठी विशेष तयारी केली असून, संबंधित प्रकरणे अध्यक्षांसमोर मांडली जातील. विजया रहाटकर यांचा हा अमरावतीचा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात त्या इतरही काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत त्या नियोजन भवन येथे सन २०१३ च्या ‘पॉश’ (POSH) अधिनियमाबाबत कार्यशाळा घेतील. त्यानंतर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘एआय’ (AI) कार्यशाळेलाही त्या उपस्थित राहतील. ‘एआय’ कार्यशाळेनंतर त्या पुन्हा नियोजन भवनात परत येऊन जनसुनावणीला उपस्थित राहतील. याच दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात महिला व बालविकास विभागासह इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीलाही अध्यक्षा उपस्थित राहतील, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांनी दिली आहे. संबंधित व्यक्तींनी जनसुनावणी तसेच इतर कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp