
सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध पाच कोटी सहा लाख रुपयांच्या वेतन अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ शिक्षकांच्या वेतनाचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. मारुती नवले यांच्यासह सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचन नवले-अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, लेखा विभागाचे संजय मोरे आणि शरद जराड यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार शिक्षिका सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये कार्यरत आहेत. एप्रिल २०२० पासून संस्थेने त्यांचे वेतन अदा केले नव्हते. गेल्या साडेपाच वर्षांपासून त्यांचे १९ लाख ३६ हजार रुपयांचे वेतन थकीत होते. त्यांच्यासह एकूण २७ शिक्षकांचे वेतन थकवण्यात आले होते. शिक्षकांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना वेतन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी फसवणूक आणि अपहाराच्या आरोपाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या तक्रारीनंतर मारुती नवले यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करत आहेत. पाषाण, नऱ्हे, बोपोडीत दुकानांचा दरवाजा तोडून रोकड चोरी पुणे शहरात दुकानांचा दरवाजा तोडून गल्ल्यातील रोकड चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांनी पाषाण, नऱ्हे, पाषाण परिसरातील तीन दुकानांचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लांबविली. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाइल संच आणि साडेनऊ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मिठाई विक्री दुकानाच्या मालकांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जु्न्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत किराणा माल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ३५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. याबाबत किराणा माल विक्रेत्याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाषाण भागात सोमेश्वरवाडीतील ओैषध विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत ओैषध विक्री दुकानाच्या मालकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मिठाई, ओैषध, किराणा माल विक्री दुकानांचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
