कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन: मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण; गुणवंत कामगारांचा सत्कारही झाला – Amravati News

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन:  मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण; गुणवंत कामगारांचा सत्कारही झाला – Amravati News



महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन स्थानिक कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, मान्यवरांच्या व्याख्यानांचे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम कामगार कल्याण मंडळाच्या रामनगर येथील ललित कला भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला युवा स्वाभिमान पक्षाचे सुनीलभाऊ राणा, अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे, नगरसेवक मंगेश मनोहरे, नगरसेविका अर्चना पाटील, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गोविंदभाऊ कासट, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. दिलीप काळे, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. श्याम देशमुख आणि ॲड. चंद्रकांत कराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रशांत ठाकरे यांच्या ‘वलय ग्रुप’ने सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला. कलाकारांनी हिंदी आणि मराठीतील एकाहून एक सरस गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हा सोहळा अकोला विभागाच्या सहाय्यक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे आणि अमरावती गटाचे कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले, तर अजय पांडे, सचिन खारोडे आणि संजय खेन्ते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अमरदीप काळे यांनी संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ललित कला भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित कामगार आणि कर्मचाऱ्यांना वृक्षलागवडीचा संदेश देत वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटपही करण्यात आले. तसेच, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विष्णू सोळंके, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते तथा ज्येष्ठ कवी रामकृष्ण चिखलकर, चारुदत्त चौधरी, मंगेश वानखडे, ॲड. चंद्रकांत कराळे, विनोद सुरोशे, सुरेश बारसे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक काळे व राजेश पाटील, उप कार्यकारी अभियंता अनिल पानोडे, रत्नाकर शिरसाट, गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या माधुरी धर्माळे, वैशाली अग्निहोत्री (चिखलकर), सेवानिवृत्त कर्मचारी जानराव ठाकरे, विजय भगत, अनिल गायकवाड आणि शरयू जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्या अंबाडकर, विनोद इंगळे, विद्या बनसोड, गीता संभे, ज्योती उमक, नंदा भोवते, ममता देव्हारे, अंजली भुसाटे, हर्षा नारळे, कुंदा तांबटकर, संजय चौधरी, अजय वाकोडे, निलेश कुकडे आणि राम अर्धापुरकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp