सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा: नोकरभरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द; खोत-पडळकरांना दणका – Mumbai News

सांगली जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा:  नोकरभरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द; खोत-पडळकरांना दणका – Mumbai News



राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण देत राज्य शासनाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लिपिक पदांच्या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू न झाल्याने शासनाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना, ‘सरकारने आपले म्हणणे मांडावे, परंतु त्यासाठी नोकरभरती थांबवता येणार नाही,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने बँकेतील नोकरभरती सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेतील तब्बल 444 कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. सांगली जिल्हा बँकेने 24 जूनपासून ‘आयबीपीएस’ मार्फत नोकरभरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, अद्याप अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 22 नोव्हेंबर 2026 रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर, निवडणुकांपूर्वीची संस्थांच्या ठरावांची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली. याच कारणास्तव राज्याच्या सहकार विभागाने 2 जुलै रोजी या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. सहकार विभागाच्या या निर्णयानंतर बँक व्यवस्थापनाने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरती आणि कारभारावरून गेल्या दोन वर्षांपासून आक्रमक असलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी, बँकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आलेली असताना ही भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या तक्रारीची थेट दखल घेत सहकार आयुक्तांनी सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश काढल्याने, या नोकरभरतीवरून सुरू असलेला हा वाद आता अधिकच चिघळला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासंदर्भातील ही देखील बातमी वाचा.. कारखाना ढापणं सोपं, मिसिंग लिंक उभारणं नाही:ज्यांना शेंबूड काढायचा माहित नाही, ते देवाभाऊंवर बोलतायत, मिसिंग लिंकवरुन पडळकरांचा रोहित पवारांना टोला ज्या लोकांना विदर्भातील प्रश्न काय आहे हे माहिती नाही, त्यांनी काही काम केले नाही. शेंबूड काढायचा माहित नाही, ते लोकं देवाभाऊंवर बोलत आहेत.हे या लोकांचे अज्ञान आहे. अरे ज्या विदर्भातून मुख्यमंत्री येतात त्या विदर्भाचा गेली 60 वर्षे विदर्भाचा राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यानी बॅकलॉक भरुण काढला नाही तो देवाभाऊंनी भरुण काढलेला आहे. त्यांनी राजकारण न करता विकासासोबत यावे, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp