‘घराबाहेर पडू नका, पर्यटन टाळा!’: मुंबईत पावसाचा कहर, परिस्थिती किती भयंकर? पाहा PHOTOS आणि VIDEO – Maharashtra News

‘घराबाहेर पडू नका, पर्यटन टाळा!’:  मुंबईत पावसाचा कहर, परिस्थिती किती भयंकर? पाहा PHOTOS आणि VIDEO – Maharashtra News



राज्यासह मुंबई आणि पुण्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावसाचा हा हाहाकार पाहता आजचा दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचा असून, दुपारनंतर ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा धडकी भरवणारा अलर्ट प्रशासनाने जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना आधीच सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. ‘आजचा दिवस अधिक गंभीर, पर्यटन टाळा’ राज्यातील या भीषण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती देत नागरिकांना सावध केले. मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबईत मान्सूनमध्ये सरासरी ८०० झाडे कोसळतात, पण काल एकाच दिवसात तब्बल ३५० झाडे पडली आहेत. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. दुपारनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने त्याचा झाडांवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे. अत्यंत गरजेचं असल्याशिवाय प्रवास करू नये आणि विशेषतः युवा वर्गाने आजच्या दिवशी पर्यटन पूर्णपणे टाळावे.” तसेच, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची विनंती केली आहे. मुंबई महापालिकेचा हाय अलर्ट एकीकडे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला असताना, मुंबई महापालिकेनेही वाऱ्याच्या वेगाबाबत गंभीर इशारा दिला आहे. शहरात प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने उघड्यावर फिरणे किंवा झाडांखाली थांबणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे मुंबईकरांनी आजच्या दिवशी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाहा, मुंबई-पुण्यासह राज्यातील पावसाचे रौद्ररूप दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ.. अंधेरी सबवे पाण्याखाली; मुसळधार पावसामुळे वाहतूक बंद मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका अंधेरी सबवेलाही बसला असून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेकडून डिवॉटरिंग मशिनच्या साहाय्याने युद्धपातळीवर पाणी उपसण्याचे काम सुरू असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. विरार जलमय, मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली मुंबई उपनगरातील विरारमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना दैनंदिन हालचालींसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाईंदर खाडीवरील रेलिंग उखडले

मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा फटका आता रेल्वे सुरक्षेलाही बसू लागला आहे. भाईंदर खाडीवरील पश्चिम रेल्वे मार्गालगतचे लोखंडी रेलिंग उखडून वाकल्याने परिसरात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मावळमध्ये घरावर दरड कोसळली; कुटुंब मातीखाली, एकाचा मृतदेह सापडला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण येथे मुसळधार पावसामुळे एका घरावर दरड कोसळून संपूर्ण कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. इतरांना शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे. प्रवासी रेल्वे रुळावरून चालत आहेत.. नालासोपारा आणि वसई दरम्यान वेस्टर्न रेल्वेची लोकल सेवा बंद पडली असून, प्रवासी रेल्वे रुळावरून चालत आहेत. इंद्रायणी नदीला पूर, आळंदीत प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली

नालासोपारा रेल्वे स्टेशन.. मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, परिस्थिती गंभीर, वाहतूक ठप्प, 24 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

कराड – चिपळूण मार्गावर झाड कोसळले जांभळी लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरला; सांडव्यावरून ५०२ क्युसेक पाण्याचा विसर्ग
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभळी लघु पाटबंधारे तलाव १०० टक्के भरला असून सध्या सांडव्यावरून ५०२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र या पाण्याचा प्रवाह थेट धोम धरणात जात असल्याने सध्या किंवा पुढील काळात कोणत्याही गावाला पूरस्थितीचा धोका नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संबंधित बातम्या वाचा.. आषाढी वारीवर पावसाचे संकट:आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन; पुणे-मुंबई एसटी सेवा बंद, धरणांत वाढू लागला पाणीसाठा राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि घाटमाथा भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक आवाहन केले आहे. दुसरीकडे मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्याने एसटी सेवा बंद करण्यात आली असून राज्यातील अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सविस्तर वाचा मुंबई-पुण्यातील घटनांवरून विधानसभेत विरोधक आक्रमक:मुख्यमंत्री म्हणाले – राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची; उद्या देणार पूर्ण निवेदन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सविस्तर वाचा.. मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा कहर:रेड अलर्टनंतर ‘वर्क फ्रॉम होम’, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, 5 जिल्ह्यांत शाळा-बंद, एसटी सेवा स्थगित राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश दिले असून अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत अधिसूचनाही जारी केली आहे. सविस्तर वाचा पहिल्याच पावसात ‘मिसिंग लिंक’ची पोलखोल?:स्लॅब कोसळला, माती आणि पाणी रस्त्यावर; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी नव्या मार्गावर खड्डे पडल्याची चर्चा सुरू असतानाच, सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅबचा काही भाग कोसळला. डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp