सातारकरांना मोठा दिलासा: कास धरण सांडव्यावरून वाहू लागले, वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर – Kolhapur News

सातारकरांना मोठा दिलासा:  कास धरण सांडव्यावरून वाहू लागले, वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर – Kolhapur News



सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या दमदार पुनरागमनानंतर कास परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा थेट परिणाम धरणातील जलसाठ्यावर झाला असून धरणाची पाणीपातळी ६१.०४८ फुटांपर्यंत पोहोचताच अतिरिक्त पाणी सांडव्यावरून वाहू लागले. धरण भरल्याने परिसरातील ओढे, नाले आणि झरेही प्रवाहित झाले आहेत. दरम्यान, कण्हेर आणि उरमोडी धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच भांबवली आणि एकीव परिसरातील धबधबेही जोरात वाहू लागल्याने निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले असून पर्यटकांचे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले असले, तरी गेल्या दहा दिवसांतील मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. उन्हाळ्यात पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती; मात्र जुलैच्या सुरुवातीपासून झालेल्या पावसाने ही तूट भरून निघाली आहे. कास धरण भरल्यामुळे सातारा शहराच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाकडूनही धरण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे धरण परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हे ही वाचा… महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 34 टक्के भरले:महाबळेश्वर महसूल मंडळात 393 मि.मी. पाऊस – जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण 33.93 टक्के भरले असून धरणातील आवक 93 हजार क्युसेक्सने होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp