बनावट ऑनलाइन पेमेंटचा सापळा उधळला: चार जिल्ह्यांसह परराज्यातही फसवणूक, 12 तासांत सराईत जेरबंद, 12 गुन्हे उघड – Kolhapur News

बनावट ऑनलाइन पेमेंटचा सापळा उधळला:  चार जिल्ह्यांसह परराज्यातही फसवणूक, 12 तासांत सराईत जेरबंद, 12 गुन्हे उघड – Kolhapur News



ऑनलाइन बँक व्यवहार झाल्याचे बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल, सोने आणि इतर वस्तू लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. तपासादरम्यान आरोपीने राज्यातील विविध ठिकाणी अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची कबुली दिल्यानंतर एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडून २३ लाख ४५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य विनोद गायकवाड (वय २२, रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे. २७ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास साताऱ्यातील पोवई नाका परिसरातील एस.एस. मोबाईल शॉपमधून आरोपीने सॅमसंग फोल्ड-७ मोबाईल खरेदी केला. मोबाईलचे ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट NEFT स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवून त्याने सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पलायन केले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईलही जप्त करण्यात आला. सखोल चौकशीत आरोपीने सातारा, सांगली, पुणे, रायगड आणि गोवा येथेही याच पद्धतीने फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार शाहूपुरी (सातारा), कासेगाव (सांगली), तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, आळेफाटा, खोपोली आणि मडगाव (गोवा) आदी ठिकाणांतील एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून सोने, महागडे मोबाईल, टीव्ही, एसी, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल असा एकूण २३.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, अशाच प्रकारे बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सातारा शहर पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे आणि डी.बी. पथकातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. हे ही वाचा… चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या:सासर्‍यालाही फोनवरून दिली धमकी, नांदेडमधील धक्कादायक घटना; आरोपी पती फरार तू काकाला का बोलली म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कठ्यातून गोळ्या झाडल्या. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी येथे सोमवारी मध्यरात्री हा गोळीबाराचा थरार घडला. पत्नीला गोळ्या घातल्यानंतर आरोपीने सासर्‍याला फोन करून ‘ तुझ्या पोरीला गोळ्या घातल्यात आता तुझ्याकडे येतो.’ अशी धमकी देऊन तो फरार झाला. सविस्तर वाचा… शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp