भाजप नेते प्रवीण दरेकर भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध: सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव – Mumbai News

भाजप नेते प्रवीण दरेकर भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या संचालकपदी बिनविरोध:  सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव – Mumbai News


महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (NCUI) च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. देशातील सहकारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोच्च संस्थेवर दरेकर यांची झालेली निवड ही महाराष

.

आमदार प्रवीण दरेकर हे सध्या मुंबई बँकेचे अध्यक्ष असून, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचीही जबाबदारी सांभाळत आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांमुळे त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना सहकाराच्या माध्यमातून अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मुंबईतील नागरिकांसाठी स्वयं पुनर्विकास योजनेला चालना देणे, मुंबई बँकेमार्फत ‘लाडक्या बहिणींना’ उद्योग-व्यवसायासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच विधिमंडळात सहकार क्षेत्राशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडणे, अशा अनेक उपक्रमांमुळे ते चर्चेत राहिले आहेत.

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ ही देशातील विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च शिखर संस्था मानली जाते. अशा संस्थेच्या संचालकपदी दरेकर यांची बिनविरोध निवड झाल्याने महाराष्ट्रातील सहकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ राष्ट्रीय स्तरावरील सहकार चळवळीला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संचालकपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप विधिमंडळ गटाच्या वतीने आमदार प्रवीण दरेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड आणि आमदार राजहंस सिंह उपस्थित होते.

दरेकर यांच्या निवडीमुळे राज्यातील सहकार क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल, अशी भावना सहकारी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp