वाखरीत 7 लाख भाविकांसाठी पालखी तळ: शौचालय परिसरात 2500 चौ. फुटांचे काँक्रीटीकरण, तर विहिरीभोवती ‎संरक्षण खांब‎ – Solapur News

वाखरीत 7 लाख भाविकांसाठी पालखी तळ:  शौचालय परिसरात 2500 चौ. फुटांचे काँक्रीटीकरण, तर विहिरीभोवती ‎संरक्षण खांब‎ – Solapur News



पालखी मार्गावरील अखेरच्या मुक्कामाचे ठिकाण असलेल्या वाखरी येथील पालखी तळावरील भाविकांच्या स्वागताची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नव्याने रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आवश्यक तेथे मुरुमीकरण, गवत, झुडुपे काढून सफाई करण्याची कामे सुरू आहेत. येत्या ८ दिवसांत संपूर्ण पालखी तळ सुसज्ज करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. वाखरी पालखी तळावर राज्यभरातून येणाऱ्या अनेक पालखी सोहळ्यांचा मुक्काम असतो. यंदा २३ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत एकनाथ, संत मुक्ताई सह राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या असंख्य पालखी सोहळ्यांचा मुक्काम असणार आहे. या दिवशी किमान पाच ते सात लाख वारकरी वाखरी मुक्कामी असतात. त्यामुळे वाखरी ग्रामपंचायत आणि पंढरपूर नगरपालिका प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी जोमाने कामास लागले आहे. याशिवाय पालखी तळाच्या उत्तर बाजूला असलेल्या शौचालय आणि स्नानगृहाकडे जाणाऱ्या सुमारे २०० मीटर्स रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथऱ्यापासून ते एमआयटी संस्थेच्या बाजूला असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला जोडणारा आणखी एक रस्ता तयार केला जात आहे. येत्या २० जुलैपूर्वी पालखी तळ सर्व सुविधांसह भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असेल, अशी माहिती नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी दिली. पालखी तळावरील वाढलेले गवत ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढण्यात येत आहे, तसेच आवश्यक तेथे मुरूम टाकून त्याचे रोलिंग करण्याचे काम सुरू आहे. पालखी तळाच्या पश्चिम बाजूला एमआयटी संस्थेला लागून असलेल्या शौचालय संकुलाच्या परिसरात चिखल होतो आणि त्याचा वापर करणे भाविकांना जिकिरीचे होते, हे लक्षात घेऊन या सर्व पाचही शौचालय युनिटच्या परिसरात सुमारे २ हजार ५०० चौरस फुटांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पडत्या पावसातही भाविकांना स्नानगृहाचा वापर करता येणार आहे.वाखरी ग्रामपंचायत आणि पंढरपूर नगरपालिका प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी जोमाने कामास लागले. याशिवाय नगरपालिकेने पिण्याच्या पाण्याच्या विहिरीभोवती मजबूत संरक्षण खांब उभे करण्याचे काम हाती घेतले आहे. पिण्याच्या पाण्याचे सर्व नळ दुरुस्ती सुरू असून स्नान करण्यास आणि पिण्यास पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, संपूर्ण पालखी तळाची सफाई पूर्ण झालेली आहे. भाविकांना पडत्या पावसातही स्नानगृहांचा वापर करता येणार

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp