मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सवर FDA चा बडगा: स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई – Maharashtra News

मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सवर FDA चा बडगा:  स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई – Maharashtra News



हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोणत्या हॉटेल्सवर झाली कारवाई?
FDA चे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात अन्नसुरक्षा विभागाकडून धडक कारवाया सुरू आहेत. याच मोहिमेअंतर्गत मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘शालिमार हॉस्पिटॅलिटी’, ‘नूर मोहम्मदी हॉटेल’ आणि ‘रहमानिया रेस्टॉरंट’ या तीन मोठ्या हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कारवाईचे मुख्य कारण काय? या सर्व गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी या तीनही हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, अमरावतीमधील ‘अमरावती दरबार’ या हॉटेललाही वैध परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्यामुळे हॉटेल बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. हॉटेलचालकांसाठी FDA चे 5 कडक नियम: या कारवाईसोबतच FDA ने सर्व हॉटेल्ससाठी काही अत्यंत कडक सूचना जारी केल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आता बंधनकारक असणार आहे: मोफत आणि स्वच्छ पाणी: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना मोफत आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देणे सक्तीचे आहे. ग्राहकाला बाटलीबंद (मिनरल) पाणी विकत घेण्यासाठी बळजबरी करता येणार नाही. शाकाहारी-मांसाहारीसाठी वेगळी व्यवस्था: शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची साठवणूक आणि ते बनवण्याची जागा पूर्णपणे वेगळी असावी. तसेच दोन्हीसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरणे बंधनकारक आहे. जळालेल्या तेलावर बंदी: एकदा तळण्यासाठी वापरलेले काळे किंवा जळालेले तेल पुन्हा वापरण्यास सक्त मनाई आहे. वृत्तपत्रात पार्सल देण्यास बंदी: ग्राहकांना वृत्तपत्राच्या कागदात अन्नपदार्थ पॅक करून देता येणार नाहीत. त्यासाठी फक्त ‘फूड-ग्रेड रॅपिंग पेपर’चाच वापर करावा लागेल. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी: हॉटेलच्या किचनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. तसेच स्वयंपाकघरात तंबाखू, गुटखा खाण्यास किंवा थुंकण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हेही वाचा.. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात: कृषीमंत्र्यांची घोषणा; पावसाबाबतही दिले अपडेट, बोगस बियाणे प्रकरणात 18 कंपन्यांवर कारवाई राज्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात सरकारने कडक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 18 बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्जमाफी, पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत चर्चांवरही भूमिका स्पष्ट केली. सविस्तर वाचा..

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp