बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत मदत, निवृत्ती वेतनही मिळणार – Mumbai News

बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:  मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत मदत, निवृत्ती वेतनही मिळणार – Mumbai News

राज्यातील असंघटित आणि कष्टकरी वर्गाला मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आर्थिक मदतीची मोठी घोषण

.

बांधकाम कामगार हा समाजातील अत्यंत तळागाळातील आणि दुर्लक्षित घटक मानला जातो. बहुतांश वेळा हा कामगार आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य असतो. कामाच्या ठिकाणी होणारे अपघात किंवा दुर्दैवाने कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. या कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सरकारने कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. याच अनुषंगाने कामगार हिताला प्राधान्य देत सरकारने जुन्या तुटपुंज्या मदतीत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आर्थिक मदतीत भरघोस वाढ

नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आता 3 लाख 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तर, दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यास ही मदत थेट 6 लाख 50 हजार रुपये इतकी असणार आहे.

दिव्यांगत्व आणि पेन्शन योजना

कामादरम्यान अपघात होऊन कामगाराला अपंगत्व (दिव्यांगत्व) आल्यास त्याला 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. तसेच, वयोमानानुसार शरीराची कार्यक्षमता घटल्याने काम न मिळणाऱ्या वृद्ध कामगारांसाठी ‘निवृत्ती वेतन’ (पेन्शन) योजनाही सुरू करण्यात आली आहे.

महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ

महिला बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या मातृत्व लाभात (मॅटर्निटी बेनिफिट्स) मोठी वाढ करण्यात आली असून, आता त्यांना 25,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे.

नोंदणी प्रक्रियेत सुलभता

कामगार मंडळात नोंदणी करण्यासाठी पूर्वी ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र लागायचे. मात्र, त्यांनी नकार दिल्याने आता कंत्राटदारांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे. याशिवाय पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि तहसीलदार यांच्या माध्यमातूनही हे प्रमाणपत्र मिळवून दिले जात आहे.

मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत कामगार कायद्यांमधील सुधारणांचा आढावा घेतला. कामगार न्यायालयांऐवजी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकडे प्रकरणे वर्ग करण्याच्या तरतुदीवर मुख्यमंत्र्यांनी सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले. मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी प्रलंबित प्रकरणांचा जिल्हानिहाय अहवाल मागवण्यात आला आहे. बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि माथाडी कामगार मंडळ या दोन्ही ठिकाणी एकाच कामगाराची दुहेरी नोंदणी (सदस्यत्व) टाळण्यासाठी लवकरच नवीन नियमावली लागू केली जाईल. तसेच, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी, विशेषतः घरकाम करणाऱ्या (घरेलू) कामगारांसाठी, केंद्राच्या नवीन कामगार कायद्यांनुसार विशेष योजना तयार करून त्या मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी आणल्या जाणार आहेत. अपघातांच्या चौकशीसाठी कडक एसओपी (SOP) ची अंमलबजावणी करून दोषींवर कारवाईची तरतूदही केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना थेट आर्थिक संरक्षण मिळाले आहे.

संबंधित बातमी वाचा…

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत मदत, निवृत्ती वेतनही मिळणार - Mumbai News

राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

रामरक्षा आंदोलन करण्यापूर्वी किमान दोन पाने तरी वाचा!:उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा, राहुल गांधींनाही सुनावले खडेबोल

बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत मदत, निवृत्ती वेतनही मिळणार - Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. तसेच, एसटी महामंडळाच्या जागांचा विकास, शेतकरी कर्जमाफी आणि 2008 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यावरही त्यांनी सविस्तर भाष्य करत विरोधकांचे आरोप खोडून काढले. येथे वाचा संपूर्ण बातमी

थेट राम मंदिरावर दरोडा, संघाची नाराजी हास्यास्पद:हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘गँग ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकार म्हणत केले लक्ष्य

बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत मदत, निवृत्ती वेतनही मिळणार - Mumbai News

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी प्रश्न, महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरून राज्य सरकार तसेच भाजपवर जोरदार टीका केली. “राम मंदिरावर थेट दरोडा पडला आहे. केवळ नाराजी व्यक्त करून काही होणार नाही,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थेट लक्ष्य केले. मराठवाड्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी

तुम लढो, हम कपडा संभालते…:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; रामरक्षा आंदोलनाची उडवली खिल्ली

बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत मदत, निवृत्ती वेतनही मिळणार - Mumbai News

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत सडकून टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाने दिलेल्या पाठिंब्यावरून आणि राज्यात सुरू केलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक देशात केवळ अराजकता पसरवण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)