आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन: छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसराला दिलासा – Chhatrapati Sambhajinagar News

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन:  छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसराला दिलासा – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. खरीप पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात ओढे-नाले, शेततळी आणि पाणवठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, हा पाऊस खरीप पिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. मात्र, पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हेही वाचा.. जायकवाडी धरणामध्ये गतवर्षी 75 तर यंदा केवळ 31.49% जलसाठा:गतवर्षी याच काळात पाच वेळा गोदापात्रात पाणी सोडले‎ जुलैचा मध्य उलटून गेला तरी जायकवाडी धरणात अद्याप लक्षणीय पाण्याची आवक झालेली नाही. गतवर्षी याच काळात धरणात प्रतिसेकंद ५२ हजार क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाणी येत होते. गेल्या वर्षी १५ जुलैपर्यंत धरणाचा साठा ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरणातून दोन महिने मुख्य दरवाजांमधून विसर्ग सुरू ठेवावा लागला. गतवर्षी पाच वेळा दीडशे टीएमसीहून अधिक पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले होते. मात्र, यंदाच्या मान्सूनची संथ सुरुवात आणि धरणातील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा..

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp