बार्शीत पाणी पेटले, सीओंच्या दालनात तोंडाला काळ्या फिती बांधून ठिय्या: पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास टाळे ठोकण्याचा अक्कलकोटे इशारा‎ – Solapur News

बार्शीत पाणी पेटले, सीओंच्या दालनात तोंडाला काळ्या फिती बांधून ठिय्या:  पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास टाळे ठोकण्याचा अक्कलकोटे इशारा‎ – Solapur News


पाणी टंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे आणि ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी (दि. १५) सकाळी तोंडाला काळ्या फिती बांधून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला. मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यां समोर

.

या ठिय्या आंदोलनात नगरसेवक कृष्णराज बारबोले, नवनाथ माळगे, मुज्जमील पठाण, महेंदमिया लांडगे, जोतिर्लिंग कसबे, सायरा मुल्ला, अजय भानवसे, शंकर देवकर, बबलू साळुंखे, आर्यन पाचपुते, प्रशांत जाधव, बाळासाहेब गंजे व बबन नायकोजी सहभागी झाले होते.

तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा शहरात १०-१२ दिवस पाणी येत नसल्याचे सांगत आंदोलकांनी शहरातील अनेक भागांत होणारा अनियमित व कमी दाबाने येणारा पाणीपुरवठा, त्यामुळे करदात्या नागरिकांना होणारा त्रास आणि प्रशासनाचे पाणी नियोजनातील अपयश यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तातडीने योग्य त्या उपाययोजना करत तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. दरम्यान, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी व जलदाय व्यवस्था अभियंता अजय होनखांबे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

आता पाणी द्या नाहीतर जनआक्रोशाचा स्फोट अटळ “नऊ-साडेनऊ वर्षे फक्त थापा, कारणे आणि फसवणूक झाली. पाणी प्रश्नाबाबत आता बैठका, आश्वासने आणि कागदी नियोजन पुरे झाले. येत्या काही दिवसांत नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर नगरपरिषदेला टाळे ठोक आंदोलन, रास्ता रोको, जनआंदोलन उभारले जाईल. नागेश अक्कलकोटे ( विरोधी पक्षनेते, बार्शी)

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp