
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबविण्यात यावी. मात्र, या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. आज विधान भवन येथील उपाध्यक्षांच्या दालनात यासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ३०१ चिंचवड येथील पर्यटन केंद्रासाठी आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या ‘अजितसृष्टी’ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या भूखंडावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे योग्य ठिकाणी व योग्य वेळेत पुनर्वसन करण्याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत संबंधित जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असून, परिसर निवासी स्वरूपाचा आहे. कामगारांसाठी घरे या योजनेअंतर्गत शाहूनगर परिसरात पुनर्वसनाची प्राथमिक तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दर्शविल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, पुनर्वसनाची प्रक्रिया लोकाभिमुख, सुसूत्र आणि सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन राबवावी. प्रत्येक पात्र रहिवाशाला नियमानुसार पर्यायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतरच ‘अजितसृष्टी’ प्रकल्पाच्या पुढील कामांना गती द्यावी, असे त्यांनी सांगितले. या बैठकीस एमआयडीसी व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते. बैठकीत पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हे ही वाचा… केतन अग्रवाल हत्याकांड:पोलिसांना चकवा देण्यासाठी सिया आणि चेतनने पाहिले जपानी व्हिडिओ! आधी ‘स्लो पॉयझन’ देण्याचा होता कट देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत आता २९ जुलैपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, सिया आणि चेतन यांचा आधी केतनला ‘स्लो पॉयझन’ देण्याचा कट होता अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सविस्तर वाचा… काटेवाडीत पार पडले तुकोबांच्या पालखीचे पहिले रिंगण:मेंढ्या का मारतात रथाला प्रदक्षिणा? जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हजारो वारकरी, भाविक आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण काटेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, हे रिंगण इतर रिंगणांपेक्षा वेगळे ठरते कारण येथे अश्वांचे (घोड्यांचे) नाही, तर ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ पार पडते. सविस्तर वाचा… ‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी ‘इठा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे नातू आणि राज्य शासनाच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
