कोंढव्यात रंगाच्या गोदामाला आग, कामगाराचा मृत्यू: पुणे येथे फिरदोस अपार्टमेंटच्या तळमजल्यावर घडली घटना – Pune News

कोंढव्यात रंगाच्या गोदामाला आग, कामगाराचा मृत्यू:  पुणे येथे फिरदोस अपार्टमेंटच्या तळमजल्यावर घडली घटना – Pune News



पुण्यातील कोंढवा परिसरातील वेताळनगर येथे शुक्रवारी रात्री एका रंगाच्या गोदामाला आग लागली. या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या महंमद इरफान युसुफ या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे आग सहा मजली इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. फिरदोस अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या या गोदामात रंग आणि पेंटिंगसाठी लागणारे ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने कोंढवा आणि परिसरातील केंद्रांवरून तीन अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना केली. ज्वलनशील पदार्थामुळे आगीने लवकरच रौद्र रूप धारण केले आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताच पाण्याचा मारा सुरू केला. दाट धूर आणि आगीच्या तीव्रतेमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्याचवेळी गोदामात एक कामगार अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी धाडसाने आत प्रवेश करून त्याला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोदामाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्यापूर्वी आतमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगदरम्यान उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल. अग्निशमन जवानांनी रात्री उशिरापर्यंत कुलिंगचे काम केले. या घटनेत गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. आग निवासी इमारतीच्या तळमजल्यावर लागल्याने रहिवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाकडून या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp