सर्वोच्च कमाई: फेडरल बँकेचा नफा 36.57% ने वाढला; चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 1,177 कोटी रुपयांचा विक्रमी नफा – Mumbai News

सर्वोच्च कमाई:  फेडरल बँकेचा नफा 36.57% ने वाढला; चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 1,177 कोटी रुपयांचा विक्रमी नफा – Mumbai News


खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या फेडरल बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27) उल्लेखनीय आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे. 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 36.57% ने वाढून 1,176.93 कोटी रुपये (सुमारे 1,177 कोटी र

.

बँकेच्या इतिहासातील ही एका तिमाहीतील सर्वोच्च नफा वसुली आहे. मुख्य व्यवसाय आणि कर्जावरील व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातील (NII) मजबूत वृद्धीमुळे बँकेने हे यश मिळवले आहे.

प्रमुख आर्थिक ठळक मुद्दे (Q1 FY27):

व्याजातून मिळणारे निव्वळ उत्पन्न (NII): बँकेचे NII वार्षिक आधारावर 26.06% ने वाढून 2,945.89 कोटी रुपये झाले आहे. कर्जांमधील वाढीपेक्षा (14.94%) उत्पन्नातील ही वाढ अधिक आहे.

एकूण व्यवसाय 6 लाख कोटींच्या उंबरठ्यावर: बँकेचा एकूण व्यवसाय 13.05% वाढून 5,97,615.83 कोटी रुपये झाला आहे. यामध्ये एकूण ठेवी 3,20,117.66 कोटी रुपये (+11.37%) आणि एकूण कर्जे 2,81,239.54 कोटी रुपये (+14.94%) आहेत.

व्याज नफ्याचा मार्जिन (NIM) सुधारला: बँकेचा ‘नेट इंटरेस्ट मार्जिन’ (NIM) 39 bps ने वाढून 3.33% वर पोहोचला आहे. ठेवींवरील खर्च (Cost of Deposits) 57 bps ने कमी होऊन 5.21% वर आल्यामुळे हा फायदा झाला.

CASA आणि NR ठेवींचा विस्तार: बँकेच्या चालू आणि बचत खात्यांमधील (CASA) ठेवी 18.26% वाढून 1,03,163.15 कोटी रुपये झाल्या आहेत. तर अनिवासी भारतीयांच्या ठेवी (NR Deposits) 14.24% वाढून 1,05,123.41 कोटी रुपये झाल्या आहेत.

गेल्या दशकातील सर्वोत्तम कर्ज गुणवत्ता (Asset Quality)

  • बँकेने आपल्या थकीत कर्जांचे प्रमाण (NPA) कमी करण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे.
  • निव्वळ थकीत कर्ज (Net NPA): अवघ्या 0.18% या दशकातील सर्वात नीचांकी पातळीवर आले आहे.
  • एकूण थकीत कर्ज (Gross NPA): 1.52% वर आले आहे.
  • नवीन थकीत कर्जे (Fresh Slippages): यात 37.79% ची घट झाली असून ती 409.48 कोटी रुपयांवर आली आहेत.
  • भक्कम आर्थिक कवच: बँकेने राखीव निधीचे प्रमाण (PCR) 1,296 bps ने वाढवून 87.37% इतके मजबूत केले आहे.

विविध क्षेत्रांमधील कामगिरी

रिटेल आणि उच्च नफा देणाऱ्या क्षेत्रांमध्ये बँकेने उत्तम वाढ नोंदवली आहे. यात गोल्ड लोनमध्ये 33%, क्रेडिट कार्ड्समध्ये 36%, कमर्शियल बँकिंगमध्ये 22.96% आणि कॉर्पोरेट बँकिंगमध्ये 16.12% वाढ झाली आहे. कॉर्पोरेट बँकिंग बुकने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

बँकेने या तिमाहीत 10 नवीन शाखा सुरू केल्या असून, आता देशभरात बँकेचे 1,650 आउटलेट्स झाले आहेत. तसेच बँकेची प्रति शेअर कमाई (EPS) 36.06% ने वाढून 19.15 रुपये झाली आहे.

“हा निकाल आमच्या कोर फ्रँचायझीची ताकद दर्शवतो. बाजारातील अस्थिरतेमुळे ट्रेझरी उत्पन्न कमी असतानाही, आमच्या मुख्य व्यवसायातून नफा 37% वाढला आहे. आमचा Net NPA 0.18% वर येणे आणि प्रोव्हिजन कव्हरेज 87% होणे हे आम्ही एक अत्यंत सुरक्षित आणि मजबूत बॅलन्स शीट तयार करत असल्याचे लक्षण आहे.” – श्री. के. व्ही. एस. मणियन, व्यवस्थापकीय संचालक (MD) व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), फेडरल बँक.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp